Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समाजातील कठोर वास्तवाचे दर्शन घडणार, लाईव्ह’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

‘लाईव्ह’ मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. गीत ध्वनीमुद्रणानंतर मुहूर्त पार पडताच मुंबईतील विविध ठिकाणी शूटिंग वेगाने सुरू असून, चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 02, 2026 | 11:26 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या ‘लाईव्ह’ या मराठी चित्रपटाने आता प्रत्यक्ष शूटिंगच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. गीत ध्वनीमुद्रणानंतर चित्रपटाचा मुहूर्त पार पडताच चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली असून, सध्या मुंबईतील विविध लोकेशन्सवर शूटिंग वेगाने सुरू आहे.

माध्यमांमध्ये या चित्रपटाबाबत येत असलेल्या अपडेट्समुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. ‘लाईव्ह’च्या कथानकाविषयी आणि सादरीकरणाविषयी चर्चा सुरू असून, चित्रपटाची टीमही जोमाने काम करत आहे.

रिद्धी बिद्दी व्हिजन्स या बॅनरखाली निर्माते सुमित पांडे ‘लाईव्ह’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते छबी असीम हल्दर असून, लेखक-दिग्दर्शक संजीव राय आहेत. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा एका महत्त्वकांक्षी तरुणीभोवती फिरणारी आहे. या कथेच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, समाजातील विविध घटनांचा वेध घेण्यात येणार आहे. नायिकेच्या संघर्ष आणि न्याय-हक्काच्या लढाईची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईतील मढ, गोरेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरू आहे. ‘लाईव्ह’ या शीर्षकावरून चित्रपटात काय पाहायला मिळणार याची कल्पना येत नाही. त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

ऐश्वर्या शेटे आता रंगभूमी गाजवणार, ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकातून करणार दमदार पदार्पण!

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक संजीव राय म्हणाले की, ‘लाईव्ह’ चित्रपटाची कथा समाजातील वास्तव चित्र दाखवणारी आहे. आजच्या युगात सर्वच क्षेत्रांमध्ये तरुणींनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तरीही त्यांच्या समोरील आव्हाने कमी झालेली नाहीत. या चित्रपटाची कथाही अशाच आव्हानात्मक प्रवासावर आधारलेली असून, सरकारी व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी आहे. समाजातील विविध घटकांचा समावेश असलेला हा चित्रपट आजवर कधीही प्रकाशात न आलेले पैलूंवर प्रकाश टाकणार आहे. वास्तवाला मनोरंजनाची जोड देत ‘लाईव्ह’ चित्रपटाच्या माध्यमातून एक संगीतप्रधान कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ‘लाईव्ह’ चित्रपटाची संपूर्ण टिम खूप मेहनत घेत असल्याचेही राय यांनी सांगितले.

Hemant Dhome Post: गौराई आली घरी! हेमंत ढोमेने फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी,चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

चित्रपटात कोणते कलाकार झळकणार?

दिग्दर्शक संजीव राय आणि पूनम विभूते यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, अनंत जोग, निशिगंधा वाड, रूपाली जाधव, हितेन तेजवानी, सागर काळे, अनिल नागरथ, नम्रता जाधव, विनय राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. गीतकार महालिंग कंठाळे यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार दिनेश अर्जुना आणि अमन श्लोक या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. डिओपी गोपी सिनेमॅटोग्राफी करीत असून, सैफुद्दीन शेख कला दिग्दर्शकाची बाजू सांभाळत आहेत.

Web Title: Filming of the movie live has begun and it is set to reach audiences soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत
1

खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत

Kamali Serial : कमळीने परीक्षेत मारली बाजी; मुंबई विद्यापीठात प्रथम, मिळाले तब्बल ‘इतके’ टक्के
2

Kamali Serial : कमळीने परीक्षेत मारली बाजी; मुंबई विद्यापीठात प्रथम, मिळाले तब्बल ‘इतके’ टक्के

”तर मी वैभव सुर्यवंशीला ‘या’ चित्रपटासाठी कास्ट केलं असतं…”, प्रसिद्ध दिग्दर्शकांनी सांगितली मनातली इच्छा
3

”तर मी वैभव सुर्यवंशीला ‘या’ चित्रपटासाठी कास्ट केलं असतं…”, प्रसिद्ध दिग्दर्शकांनी सांगितली मनातली इच्छा

ऐश्वर्या शेटे आता रंगभूमी गाजवणार, ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकातून करणार दमदार पदार्पण!
4

ऐश्वर्या शेटे आता रंगभूमी गाजवणार, ‘आता थांबवायचं कसं?’ नाटकातून करणार दमदार पदार्पण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.