Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भूतम भयम्’च्या ‘पैशाचा पाऊस’ रॅपचा जल्लोषात म्युझिक लॉन्च; विद्यार्थ्यांसोबत रंगली धमाल

'पैशाचा पाऊस' या रॅपमुळे 'भूतम भयम्' चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. जोशपूर्ण संगीत, भन्नाट रॅप आणि तरुणाईला भावणारी मांडणी यामुळे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने चित्रपटाच्या टीमचा उत्साहही द्विगुणित झाला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 05:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठीतील आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. भन्नाट कथा, तरुण कलाकारांची दमदार फौज आणि हटके सादरीकरणामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच चित्रपटातील ‘पैशाचा पाऊस’ हे रॅप गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, त्याचा म्युझिक लॉन्च सोहळा रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या जल्लोषात पार पडला.

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार

या कार्यक्रमासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम महाविद्यालयात उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत करत गाण्याच्या तालावर ठेका धरला. गाणे प्रदर्शित होताच संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या गाण्यावर खास नृत्य सादर करून चित्रपटाच्या टीमला सुखद धक्का दिला. कलाकारांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत अनेक आठवणींचे क्षण अनुभवले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘पैशाचा पाऊस’ रॅपने तरुणाईची पसंती मिळवल्याचे स्पष्ट झाले.

या गाण्यात सात मित्रांची भन्नाट मैत्री, जोशपूर्ण बीट्स आणि आकर्षक पिक्चरायझेशन पाहायला मिळते. गाण्याचे बोल श्रेयस सागवेकर आणि श्रीनाथ म्हात्रे यांनी लिहिले असून, संगीतही श्रीनाथ म्हात्रे यांचे आहे. ‘तांबडी चामडी’ या गाण्यामुळे लोकप्रिय झालेल्या रॅपर श्रेयस सागवेकर यांनी आपल्या दमदार आवाजाने या रॅपला वेगळी ऊर्जा दिली आहे.

यावेळी दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर यांनी सांगितले की, ‘भूतम भयम्’ हा चित्रपट तरुणाईची मैत्री, त्यांची धमाल आणि उत्साह मोठ्या पडद्यावर साकारतो. ‘पैशाचा पाऊस’ रॅप हा त्याच ऊर्जेचा भाग असल्याने विद्यार्थ्यांसमोरच हे गाणे लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहून चित्रपटालाही भरघोस प्रेम मिळेल, असा विश्वास वाटतो.

रॅपर श्रेयस सागवेकर यांनीही हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले. ‘तरुणाईची भाषा, त्यांचा स्वॅग आणि त्यांची ऊर्जा गाण्यात आणण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी गाण्यावर केलेला जल्लोष आणि डान्स पाहून आमच्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना मनात निर्माण झाली,’ असे ते म्हणाले.

Samarth Movie : सिनेमाचा म्युजिक लाँच सोहळा पडला पार! समर्थ रामदासांचे विचार आणि सुमधुर संगीत


झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे चित्रपटाचे निर्माते असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर यांची लोकप्रिय ‘ऑरेंज ज्यूस गँग’ प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. हॉरर, कॉमेडी आणि मैत्रीचा अनोखा संगम असलेला ‘भूतम भयम्’ हा चित्रपट २४ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Grand music launch for the paishacha paus rap from bhutam bhayam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Indian Music
  • tech launch

संबंधित बातम्या

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
2

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
4

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.