Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल; ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

‘किस्सा शुरू टॉकीज’ उपक्रमाचे आशिष शेलार आणि सचिन पिळगांवकर यांनी कौतुक केले असून ग्रामीण भागात चित्रपट पोहोचवण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न ठरत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 30, 2026 | 10:24 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चित्रपटगृहांची उपलब्धता नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांना शहरांकडे जावे लागते. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आता गावोगावी घरबसल्या नवीन चित्रपट पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती

कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली. यामध्ये दीपक तिजोरी, दिग्दर्शक अभिजीत पानसे, विजू माने, समीर विद्वांस, आशिष बेंडे, सुबोध खानोलकर, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, पुष्कर जोग, विशाखा सुभेदार यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता.

‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे ग्रामीण प्रेक्षकांना नवीन चित्रपटांचा थेट आणि सुलभ अनुभव मिळणार असून, डिजिटल माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात नवा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.ग्रामीण प्रेक्षकांसाठी चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक सुलभ आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने ‘किस्सा शुरू टॉकीज’ होम सिनेमा हे एचडीएमआय आधारित नवीन उपकरण सादर करण्यात आले आहे. हे डिव्हाईस थेट टीव्हीला जोडता येते आणि त्याद्वारे प्रेक्षकांना घरबसल्या नवीन चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे.

९९ रूपयात पाहता येणार आपल्या पसंतीचा चित्रपट

या प्रणालीअंतर्गत चित्रपट निर्माते आपले चित्रपट ‘केएसटी’ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देतील. दर शुक्रवारी नवीन चित्रपट या डिव्हाईसमध्ये डाउनलोड होतील. प्रेक्षकांना केवळ ९९ रुपये शुल्क भरून आपल्या पसंतीचा चित्रपट पाहण्याची सुविधा मिळणार असल्याने ग्रामीण भागासाठी हा परवडणारा आणि सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

या उपकरणामध्ये दोन पेटंट-पेंडिंग तंत्रज्ञानांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ‘फॅमिली सेफ मोड’ ही सुविधा असून, त्याद्वारे कुटुंबासाठी योग्य आणि वयानुरूप कंटेंट नियंत्रित करता येणार आहे. तसेच ‘निर्माता-ते-थेट-प्रेक्षक व्हिडिओ कॉल’ प्रणालीच्या माध्यमातून चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक थेट प्रेक्षकांशी संवाद साधू शकणार आहेत.

Madhuri Dixit Viral Video: AI तंत्रज्ञानाचा गैरवापर; डीपफेकची बळी ठरली माधुरी दीक्षित, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क

‘किस्सा शुरू टॉकीज’शी संलग्न होणाऱ्या पहिल्या चित्रपटाचीही घोषणा
चित्रपटांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक डीआरएम आणि फॉरेन्सिक वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.या कार्यक्रमात ‘किस्सा शुरू टॉकीज’शी संलग्न होणाऱ्या पहिल्या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामीण प्रेक्षकांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले.या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना संस्थापक संतोष बिराजदार, अभिषेक जठार आणि शिरीष शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील हजारो गावांमध्ये चित्रपटगृहे नसल्यामुळे ग्रामीण प्रेक्षक नव्या चित्रपटांपासून वंचित राहातात. हीच गरज ओळखून ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा पर्याय निर्माण करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार मनोरंजन पोहोचवण्यासोबतच मराठी चित्रपटांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे.’’

ग्रामीण भागात चित्रपट पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘किस्सा शुरू टॉकीज होम सिनेमा’ या उपक्रमाबाबत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना ही संकल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण आणि काळाची गरज ओळखणारी असल्याचे सांगितले.

Tumbadchi Manjula:  लांब केस, दाट दाढी अन्…, विनोदी भूमिकांनंतर आता साधूच्या भूमिकेत; ओळखलंत का हा मराठी अभिनेता?

“मराठी तरुणांनी एकत्र येत सुरू केलेल्या या उपक्रमामागची संकल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण आहे. ‘आपल्या घरचा चित्रपट’ ही भावना जपत, चित्रपट प्रदर्शित होताच तो गावागावांत आणि घराघरांत पोहोचवण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे,” असे मत शेलार यांनी व्यक्त केले. तसेच मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारा हा उपक्रम मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे. “महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण आणि तालुका भाग आजही चित्रपटगृहांच्या सुविधेपासून वंचित आहेत. अनेक प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ही संधी ग्रामीण प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार असून दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक या तिन्ही घटकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. त्यांनी या उपक्रमाशी संबंधित संतोष बिराजदार आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

 

Web Title: Kissa shuru talkies home cinema ashish shelar sachin pilgaonkar reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • Ashish Shelar
  • marathi movie
  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

‘…हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार’; ४५ कोटी देत असल्याची मंत्री आशिष शेलारांची माहिती
1

‘…हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार’; ४५ कोटी देत असल्याची मंत्री आशिष शेलारांची माहिती

Marathi Movie: ‘एक होतं माळीण’ पावसात संपूर्ण गाव इतिहासजमा, Trailer पाहून अंगावर येईल काटा
2

Marathi Movie: ‘एक होतं माळीण’ पावसात संपूर्ण गाव इतिहासजमा, Trailer पाहून अंगावर येईल काटा

Ratnagiri Politics : ‘सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे…’; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
3

Ratnagiri Politics : ‘सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे…’; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे
4

The India Story हे असंच सुरू राहिलं तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही -श्रेयस तळपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.