Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर सुनेत्रा पवार आणि अदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात अनावरण झाले. पूजा सावंत आणि अक्षया नाईक प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 19, 2026 | 01:49 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Lagna Ani Barach Kahi: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयपूर्ण आणि वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अशाच एका वेगळ्या विषयाची मांडणी करणारा ‘लग्न आणि बरंच काही’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्त्रीचे भावविश्व, लग्नानंतर बदलणारी नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा तिचा प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे मंत्रालयात अनावरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ‘लग्न आणि बरंच काही’च्या पोस्टरचे अनावरण झाले. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पोस्टर अनावरणामुळे चित्रपटाच्या आशयासोबतच त्यामागील महिला नेतृत्वाचीही चर्चा सुरू झाली आहे.

तीन पिढ्यांतील महिलांना जोडणारी कथा

म्हाळसा एंटरटेन्मेंटच्या डॉ. संजना सुरेश पै आणि अव्यान आर्ट्सच्या अंजली तुषार नान्नजकर यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले आहे.

चित्रपटाच्या विषयाचे कौतुक करताना अदिती तटकरे यांनी मुलीच्या जन्मापासून तिचे बालपण, तारुण्य आणि पुढील आयुष्यापर्यंतच्या विविध अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचे नमूद केले. आजी, आई, सध्याची पिढी आणि पुढील पिढी अशा तीन पिढ्यांतील महिलांना हा विषय जोडणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच, हा चित्रपट केवळ महिलांसाठीच नाही, तर पुरुषांनाही नातेसंबंध आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देईल, असेही त्यांनी सांगितले.

लग्नापलीकडचा स्त्रीचा प्रवास

‘लग्न’ ही केवळ आयुष्यातील एक घटना नसून त्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. बदलती नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, स्वतःच्या इच्छा-आकांक्षा आणि स्वप्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्याचा संवेदनशील वेध ‘लग्न आणि बरंच काही’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

विशेष म्हणजे चित्रपटाच्या पडद्यामागील निर्मितीमध्येही महिलांचा मोठा सहभाग आहे. चित्रपटाचे संगीत वैशाली सामंत, छायाचित्रण स्मिता निर्मळ, संकलन भक्ती मायाळू, संवाद शर्वरी पेटकर, कथा यशश्री मसूरकर, तर वेशभूषेची जबाबदारी अपेक्षा गांधी सोनी यांनी सांभाळली आहे.

याशिवाय मीडिया दिग्दर्शन प्रज्ञा सुमती, डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर आणि पब्लिसिटी डिझाइन प्राजक्ता डोंगरे यांनी केले आहे.

The Revolutionaries: १८५७ नंतरच्या भारतातील क्रांतिकारकांची कहाणी; ‘द रेव्होल्यूशनरीज’चा २४० हून अधिक देशांत प्रीमियर

पूजा सावंत आणि अक्षया नाईक प्रमुख भूमिकेत

अभिनेत्री पूजा सावंत आणि अक्षया नाईक या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अभिनयातून स्त्रीच्या आयुष्यातील नातेसंबंध आणि भावनिक पैलू कशा पद्धतीने मांडले जातात, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

मंत्रालयात पोस्टर अनावरण झाल्यानंतर ‘लग्न आणि बरंच काही’च्या कथानकाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. स्त्रीच्या दृष्टिकोनातून लग्न, नाती, जबाबदाऱ्या, आकांक्षा आणि स्वतःची ओळख यांचा वेध घेणारा हा चित्रपट प्रेक्षकांना काय अनुभव देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Hiten Tejwani: हितेन तेजवानीची मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री, साकारणार आजवरची सर्वात वेगळी भूमिका!

Web Title: Lagna ani barach kahi marathi movie poster pooja sawant akshaya naik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Pooja Sawant
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?
1

Drishyam 3: २ ऑक्टोबरला ‘दृश्यम 3’ पाहा अन् फ्रीमध्ये पावभाजी खा; जाणून घ्या ‘या’ ऑफरसाठी नेमकं काय करावं लागणार?

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
2

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
3

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
4

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.