Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Lalit Prabhakar-Prajakta Mali: ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर १३ वर्षांनी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी पुन्हा एकत्र दिसणार आहेत. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 01:03 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

१३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार ललित-प्राजक्ता

‘शुभ मंगलम जोडी दंगलम’मध्ये दिसणार नवी प्रेमकहाणी

शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर चर्चेत

maramaratLalit Prabhakar-Prajakta Mali: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली ही जोडी तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ या आगामी चित्रपटातून दोघेही मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

१३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र

ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांना एकत्र पाहण्याची इच्छा त्यांच्या चाहत्यांकडून अनेकदा व्यक्त केली जात होती. ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील त्यांच्या सहजसुंदर केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. त्यामुळे आता १३ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा पडद्यावर एकत्र येत असल्याने चाहत्यांसाठी हा नक्कीच खास अनुभव ठरणार आहे.

‘शुभ मंगलम जोडी दंगलम’च्या टीझरमधून चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नसली, तरी ललित आणि प्राजक्ता यांची जोडी पुन्हा पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाबाबत कुतूहल निर्माण झालं आहे.

Maharashtrachi HasyaJatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर जल्लोष! केक कापून साजरं केलं खास सेलिब्रेशन; जाणून घ्या कारण

प्रेम, गंमतीजंमती आणि अनपेक्षित वळणं

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतीक पाटील करत आहेत. ललित प्रभाकर, प्रतीक पाटील आणि इरावती कर्णिक यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. तर संवादलेखन इरावती कर्णिक यांनी केलं आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रतीक पाटील यांनी सांगितलं की, ललित आणि प्राजक्ता यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आधीपासूनच आहे. मात्र, त्यांना पुन्हा एकत्र आणताना जुन्या ओळखीपलीकडे जाऊन एका नव्या विश्वात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’मधील त्यांचा प्रवास प्रेम, गंमतीजंमती आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘लोकप्रिय जोडीची केवळ पुनरावृत्ती नाही’

निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनीही या जोडीला पुन्हा एकत्र आणण्याबद्दल आनंद व्यक्त केला. ललित आणि प्राजक्ता यांना पुन्हा एकत्र पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा होती. मात्र, या चित्रपटात केवळ लोकप्रिय जोडीची पुनरावृत्ती नसून त्यांच्यासाठी नवी कथा आणि नवं विश्व तयार करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

निर्मात्या अश्विनी ब्रह्मनाथकर यांनीही ललित-प्राजक्ताची पडद्यावरील केमिस्ट्री आणि सहजता या कथेच्या भावविश्वाला योग्य असल्याचं म्हटलं. चित्रपटाच्या टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रेक्षकांमध्ये या जोडीच्या पुनरागमनाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे

‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ची निर्मिती

ज्युबिलंट फिल्म्स स्टुडिओ निर्मित या चित्रपटाचे निर्माते नितीन प्रकाश वैद्य आणि अश्विनी ब्रह्मनाथकर आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रतीक पाटील यांनी सांभाळली आहे. ललित प्रभाकर, प्रतीक पाटील आणि इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून साकारलेली ही कथा प्रेक्षकांना प्रेमकहाणीच्या माध्यमातून मनोरंजनाची मेजवानी देणार आहे.

आता तब्बल १३ वर्षांनंतर ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची ही नवी ‘रेशीम’ केमिस्ट्री नेमकं कोणतं वळण घेते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Lalit prajakta reunite after 13 years shubh mangalam jodi dangal teaser out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा
2

Bhootam Bhayam Movie: ‘भूतम भय्यम’च्या कलाकारांमध्ये असं तयार झालं बॉन्डिंग; दिग्दर्शकांनी सांगितला २५ दिवसांच्या वर्कशॉपचा किस्सा

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?
3

Miranda Warning movie: जान्हवी किल्लेकरचा ‘मिरांडा वॉर्निंग’मधील लूक पाहिलात का? एका नजरेने वाढवलं रहस्य, नेमकी भूमिका काय?

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो
4

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.