फोटो सौजन्य - Social Media
सिनेमाचा टीझर झाला Out!!
‘इंद्रजाल’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमात अघोर आणि त्यामागील भय हे दोन पैलू दाखवण्यात येणार आहेत. सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला एक डायलॉग आहे. ‘बागियो का गाव रहा, अब अघोरी छाव है’. एकंदरीत विद्रोह करणाऱ्या किंवा बंडखोऱ्यांच्या या गावामध्ये आता एक अघोर सावली पसरली आहे आणि त्यातून स्थानिक कसे बचाव करतात? त्यांचा संपूर्ण संघर्ष या सिनेमात पाहता येणार आहे. अनुभवता येणार आहे.
Sucheta Ajay Nikam या सिनेमाच्या निर्मात्या असून सिनेमात महेश निकम, यशराज डिंबळे, कल्पना सारंग आणि अभिनेता किरण मानेदेखील झळकणार आहे. एकंदरीत, सिनेमात मराठमोळी टीम दिसून येत आहे.
काय आहे सिनेमा?
प्राचीन लोककथांच्या गूढ आणि अंधकारमय विश्वात घडणारी ही कथा एका दंतकथेतल्या अमाप खजिन्याच्या शोधाभोवती फिरते. या प्रवासात अघोरीच्या भयावह सावटाखाली जगणाऱ्या बंडखोरांच्या एका गावाची कहाणी उलगडते. जीवघेणे भ्रम, अघोरी साधू आणि गूढ शक्तींनी भरलेल्या या कथेत शेवटी एकच सत्य समोर येते ‘गूढ खजिन्यापेक्षा माणसाचा लोभच अधिक विनाशकारी ठरू शकतो.’






