Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती

Bandkhor: स्त्री च्या बेधडक रुपाची झलक दाखवणारी ‘बंडखोर’ ही कलाकृती प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर घेऊन येत आहे. २४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून टीझर नुकताच प्रदर्शित झालाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 24, 2026 | 08:56 PM
बंडखोरचा टीझर प्रदर्शित

बंडखोरचा टीझर प्रदर्शित

Follow Us
Follow Us:
  • महेश मांजरेकर यांची दमदार कलाकृती २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
  • सहा बंडखोर महिलांची गोष्ट येतेय 
  • टीझरने आता उत्सुकता वाढवली आहे 
Bandkhor: स्त्री म्हणजे केवळ परिस्थितीशी जुळवून घेणारी किंवा तडजोड करणारी व्यक्ती नाही, तर वेळ आली तर परिस्थितीविरोधात उभी राहून स्वतःसाठी निर्णय घेणारी स्त्रीही आहे. स्त्रीच्या याच बेधडक रूपाची झलक दाखवणाऱ्या ‘बंडखोर’ या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टीझरमध्ये या सहा ‘बंडखोर’ स्त्रिया एकत्र आलेल्या दिसतात. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, त्या कशाच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत आणि त्यांची ही बंडखोरी नेमकी कशासाठी आहे, याची उत्सुकता टिझरनंतर अधिकच वाढली आहे. परिस्थितीपुढे मान झुकवण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वासाठी आवाज उठवणाऱ्या या सहा जणींची गोष्ट नेमकी कोणत्या वळणावर जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

Don’t Be Shy : मैत्री, प्रेम आणि तरुणपणाचा प्रवास…आलिया आणि शाहीन भट्टचा ‘डोंट बी शाय’ चित्रपट, ‘या’ तारखेला ग्लोबल प्रीमियर

बंडखोरी नक्की काय आहे?

नावातच ‘बंडखोर’ असलेल्या या सहा जणींची बंडखोरी नेमकी कशासाठी? स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या निर्णयांसाठी की आयुष्याने त्यांच्यावर लादलेल्या चौकटी मोडण्यासाठी? हे पाहाणं आता रंजक ठरणार आहे.

काय म्हणाले महेश मांजरेकर 

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले की, “‘बंडखोर’ हा फक्त महिलांसाठीचा चित्रपट नाही. या सहा स्त्रिया ज्या परिस्थितीतून जातात, त्यात अनेकांना आपल्या घरातल्या, आजूबाजूच्या स्त्रियांचं प्रतिबिंब दिसेल. प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक गोष्ट असते, तिचे प्रश्न असतात आणि त्यांना सामोरं जाण्याची तिची स्वतःची पद्धत असते. ‘बंडखोर’मधल्या या सहा जणी परिस्थितीची बळी होऊन बसणाऱ्या नाहीत, तर तिच्याशी दोन हात करणाऱ्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक पुरुषानेही आपल्या आई, बहीण, बायको, मुलगी आणि मैत्रिणीसोबत आवर्जून पाहावा, असं मला वाटतं.”

संजय शेटये, विनसन ग्राफिक प्रोडक्शन निर्मित आणि सत्यसाई फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Film Festival: अंजली पाटीलची ‘सेल्वी’ची जगभरात झेप! बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार दिमाखदार वर्ल्ड प्रीमियर

Web Title: Mahesh manjrekar bandkhor teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • Entertainment News
  • mahesh manjrekar
  • marathi movie

संबंधित बातम्या

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी
1

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता
2

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
3

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार
4

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.