Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह

Maitreya Marathi Movie:‘ मैत्रेया’ चित्रपटातील ‘तुझे नाव घेता’ हे गणपती गीत रिलीज झालं आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर वानखेडे आणि उर्मिला कानेटकर यांच्या खास डान्सने गाण्याची रंगत वाढवली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 09, 2026 | 03:57 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Maitreya Marathi Movie: सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्साहात भर घालणारं ‘तुझे नाव घेता’ हे बहारदार गणपती गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आगामी ‘मैत्रेया’ चित्रपटातील हे गाणं सध्या चर्चेत असून, ढोल-ताशांचा जल्लोष, भक्तीमय वातावरण आणि धमाकेदार नृत्य यामुळे गाण्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

समर, आयुषी, स्काय आणि रूचीवर चित्रीत गाणं

‘तुझे नाव घेता’ हे गाणं समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. गणपती उत्सवाचा जल्लोष, कलाकारांचा उत्साह आणि दमदार बीट्स यामुळे गाण्याला खास फेस्टिव्ह रंग आला आहे.

या गाण्यात प्रेक्षकांना एक खास सरप्राईजही पाहायला मिळतं. दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघींची खास नृत्य अदाकारी गाण्यात पाहायला मिळणार आहे. अनेक काळानंतर या दोघींना एकत्र नृत्य करताना पाहण्याची संधी मिळणार असल्याने गाण्याची रंगत आणखी वाढली आहे.

शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांचा दमदार आवाज

‘तुझे नाव घेता’ या गाण्याला गुरू ठाकूर यांचे शब्द लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांच्या दमदार आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे.

गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि उत्सवाचा जल्लोष यांचा सुंदर मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे. आकर्षक नृत्य, दमदार संगीत आणि कलाकारांचा उत्साह यामुळे गणेशोत्सवाच्या वातावरणात हे गाणं रंग भरणार असल्याचं दिसत आहे.


Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

क्रांती रेडकर म्हणाली, ‘उर्मिलासोबत पुन्हा नृत्य करणं खास अनुभव’

गाण्याबद्दल दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणाली, “गणपती बाप्पा आणि मराठी माणसाचं नातं खूप खास आहे. त्यामुळे ‘तुझे नाव घेता’ हे गाणं करताना त्यात भक्ती तर असावीच, परंतु त्याचबरोबर गणपतीच्या उत्सवाचा आनंद, उत्साह आणि जल्लोषही दिसावा, अशी आमची इच्छा होती.”

ती पुढे म्हणते, “पंकज पडघन यांचं संगीत, गुरू ठाकूर यांचे शब्द आणि शिवम सिंग व अपूर्वा निषाद यांचे आवाज यामुळे गाणं खूप सुंदर जमून आलं आहे. उर्मिला आणि मी अनेक काळानंतर एकत्र नृत्य करताना दिसणार आहोत, हा माझ्यासाठीही खास अनुभव आहे.”

‘तुझे नाव घेता’ गाणं का आहे खास?

संगीतकार पंकज पडघन यांच्या मते, गाण्यात गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि उत्सवाचा जल्लोष या दोन्ही गोष्टी संगीतामधून जाणवाव्यात, यासाठी पारंपरिकतेसोबत आजच्या पिढीलाही आवडेल असा उत्साहपूर्ण साउंड ठेवण्यात आला आहे.

क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर यांच्या नृत्याची खास झलक हे गाण्याचं आणखी एक आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

‘मैत्रेया’ २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला

समर टाईम्स प्रॉडक्शन प्रस्तुत ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत.

चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘तुझे नाव घेता’ या गाण्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली असून, ‘मैत्रेया’ येत्या २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Maitreya marathi movie tujhe nav gheta song kranti redkar urmila kanetkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Ganapati Festival
  • Ganesh Chaturthi 2026
  • Kranti Redkar Wankhede
  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या
1

Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
3

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.