Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ कोण? अखेर नाव आलं समोर;अभिनेत्रीची नाटकातून सिनेसृष्टीत दमदार एंट्री

Pach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ या मराठी सिनेमातील मुख्य भूमिकेचा उलगडा झाला आहे. अभिनेत्री श्रुती मधुदीप नाटकानंतर आता या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 23, 2026 | 08:50 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अभिनेत्री श्रुती मधुदीपचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
  • चित्रपटात कलाकरांची फौज
  • ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार
Pach Futacha Bachchan: नाटक, शॉर्टफिल्म्स आणि कथकच्या माध्यमातून अभिनयाची वाटचाल करणारी युवा अभिनेत्री श्रुती मधुदीप आता रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘पाच फुटाचा बच्चन’ या आगामी मराठी चित्रपटात श्रुती प्रमुख भूमिका साकारणार असून विशेष म्हणजे, याच नावाच्या मूळ नाटकातही तिने ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

नावापासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’मध्ये नेमका बच्चन कोण, याचे रहस्य आता उलगडले आहे. श्रुती मधुदीप या चित्रपटात ‘पाच फुटाचा बच्चन’ ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नाटकानंतर त्याच भूमिकेतून सिनेमात पदार्पण करण्याची संधी मिळाल्याने श्रुतीसाठी हा प्रवास विशेष ठरला आहे.

नाटक ते सिनेमा असा प्रवास

लहानपणापासूनच श्रुतीचा कल कला क्षेत्राकडे होता. गाणं, नृत्य आणि अभिनयाची आवड असलेल्या श्रुतीने तब्बल आठ वर्षे कथकचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिने नाटक आणि शॉर्टफिल्म्समध्ये काम करण्यास सुरुवात केली.

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्यासोबत सहाय्यक म्हणून काम करण्याची संधीही श्रुतीला मिळाली. या अनुभवातून तिला चित्रपट हे माध्यम समजून घेण्यास मदत झाली. कथा आणि आशयाकडे पाहण्याची दृष्टी तसेच कलाकार म्हणून व्यक्तिरेखा कशी जगायची, याचे मार्गदर्शन तिला या काळात मिळाले.

सुमित्रा भावे यांच्या ‘साखरेपेक्षा गोड’ या शॉर्टफिल्ममध्ये श्रुतीने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या नाटकाच्या माध्यमातून तिला वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली.

शहरी मुलीपासून रांगड्या कोल्हापुरी मुलीपर्यंत

श्रुतीने ‘पाच फुटाचा बच्चन’मधील भूमिकेविषयी बोलताना सांगितले की, शहरी वातावरणात वाढलेल्या तिच्यासाठी कोल्हापूरच्या रांगड्या मुलीची भूमिका साकारणं हा एक वेगळा अनुभव होता. या भूमिकेमुळे तिला अभिनयातील नवा पैलू अनुभवता आला.

मूळ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याच कथेवर चित्रपट तयार झाला आहे. नाटकाचं सिनेमात रूपांतर होणं आणि त्यात आपलीच मध्यवर्ती भूमिका कायम राहणं, हा अनुभव स्वप्नवत असल्याचं श्रुतीने सांगितलं.

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

दिग्दर्शन आणि कलाकारांची भक्कम फळी

‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटात श्रुती मधुदीपसोबत गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून श्रुती मधुदीपच्या रुपेरी पडद्यावरील पदार्पणाकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Mohsin Khan Engagement: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम मोहसिन खानचा थाटात पार पडला साखरपुडा; अभिनेत्याने सांगितली लव्ह स्टोरी

Web Title: Pach futacha bachchan shruti madhudeep marathi movie debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान
1

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार
2

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
3

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
4

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.