Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Patri Sarkar: स्वातंत्र्यलढ्याची धग रूपेरी पडद्यावर; ‘पत्री सरकार १९४२’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

Patri Sarkar: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकाराच्या शौर्यगाथेवर आधारित 'पत्री सरकार १९४२' चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Patri Sarkar: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अध्याय आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘पत्री सरकार १९४२’चं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात स्थापन झालेल्या प्रतिसरकाराच्या ऐतिहासिक संघर्षाची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

पोस्टरमध्ये हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार झालेला योद्धा आणि ब्रिटिश सैनिकांशी सुरू असलेला संघर्ष प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. पार्श्वभूमीतील धूर, ज्वाळा आणि युद्धजन्य वातावरण चित्रपटाच्या कथानकातील संघर्षाची तीव्रता अधोरेखित करत असून, पोस्टरवरूनच हा चित्रपट भव्य ऐतिहासिक अनुभव देणार असल्याचं स्पष्ट होतं.

१९४२ साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश सत्तेला मोठं आव्हान दिलं होतं. त्यांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी. डी. लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासह हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी सावकारशाही, ब्रिटिश सत्ता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष छेडला. या अज्ञात क्रांतीवीरांच्या शौर्याची कथा ‘पत्री सरकार १९४२’मधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

भागीरथी मोशन पिक्चर प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, गीत आणि संगीताची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. संकलन कर्तव्य मोकल, छायाचित्रण संदीप वाटवे, सुमेध मराठे आणि परमहंस पाठक, तर पार्श्वसंगीत सौरभ लता शिवकुमार यांनी दिलं आहे. चित्रपटातील गाण्यांना विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांनी आवाज दिला आहे.

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक मनीष अनसुरकर म्हणाले, “ब्रिटिशांविरोधात पेटलेल्या क्रांतीचं वास्तव आणि त्या काळातील संघर्ष पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर साकारताना मोठी जबाबदारी होती. मात्र संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हा प्रवास शक्य झाला. पोस्टरनंतर आता लवकरच टीझर आणि ट्रेलरमधून चित्रपटातील आणखी अनेक पैलू प्रेक्षकांसमोर येतील.”

Ramayana Movie: भारतच नव्हे, पाकिस्तानातही ‘रामायण’ची क्रेझ; ट्रेलर पाहून पाकिस्तानी नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्यलढ्याची आणि अज्ञात क्रांतीवीरांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला असून, पोस्टरनंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Web Title: Patri sarkar 1942 first poster unveiled a grand tribute to krantisinh nana patils heroic legacy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
2

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.