Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pooja Sawant: ‘अधीर मन झालं’साठी २ दिवस भिजलेल्या साडीत शूटिंग; पूजा सावंतने सांगितली पडद्यामागची गोष्ट

Pooja Sawant: पूजा सावंतच्या 'अधीर मन झालं' या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे.या गाण्यासाठी तिने दोन दिवस ओली साडी नेसल्याचे ही तिने सांगितले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 10, 2026 | 09:48 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pooja Sawant: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनयासोबतच नृत्याच्या अदाकारीनेही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. तिच्या काही भूमिका आणि गाण्यांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यातीलच एक गाजलेलं गाणं म्हणजे ‘अधीर मन झाले’. या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा भन्नाट किस्सा पूजाने अनेक वर्षांनंतर सांगितला आहे.

पूजाने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ‘अधीर मन झाले’ या गाण्याबद्दल अनेक आठवणी शेअर केल्या. विशेष म्हणजे या गाण्यासाठी कोणतीही ठरावीक कोरिओग्राफी करण्यात आली नव्हती. याबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, हे गाणं प्रत्येक मुलीला कनेक्ट होतं. गाण्याचं शूटिंग करताना कोरिओग्राफी झालीच नव्हती. दिग्दर्शक गजेंद्र सरांनी गाणं लावलं आणि ‘तुला जसं वाटेल तसा डान्स कर, तुला जमेल तसं नाच’ असं सांगितलं.

पूजाने पुढे सांगितलं की, कदाचित त्यामुळेच हे गाणं प्रत्येकाला रिलेट होत असेल. ‘मी जर पावसात डान्स केला तर मी पण अशीच नाचेन,’ अशी भावना हे गाणं पाहताना प्रेक्षकांना येत असावी. गाणं शूट करण्याच्या दोन दिवस आधीच तिला ते देण्यात आलं होतं. त्यामुळे गाण्यासाठी काय करायचं आहे, याची कल्पना तिला होती. मात्र, हे गाणं तिने अगदी मनापासून केल्याचंही पूजाने सांगितलं.

दुसऱ्या दिवशीही नेसावी लागली ओली साडी

‘अधीर मन झाले’च्या शूटिंगचा आणखी एक मजेशीर किस्सा पूजाने सांगितला. या गाण्याचं शूटिंग दोन दिवस सुरू होतं. पहिल्या दिवशी पावसात शूटिंग करताना पूजा पूर्णपणे भिजली होती. मात्र, दुसऱ्या दिवशीच्या शूटिंगसाठी तिच्याकडे दुसरी साडीच नव्हती.

पहिल्या दिवशी शूटिंग संपल्यानंतर तिने तीच साडी रात्री वाळत घातली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजताच तिचा कॉल टाइम होता. तोपर्यंत साडी पूर्णपणे वाळली नव्हती. त्यामुळे नाईलाजाने पूजाला दुसऱ्या दिवशीही ती ओली साडीच नेसून शूटिंग करावं लागलं.

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव

‘पावसाळी पिकनिकच होती’

या सगळ्या परिस्थितीचा मात्र पूजाने अजिबात त्रास करून घेतला नाही. उलट या शूटिंगचा तिने मनमुराद आनंद घेतला. पूजाला पावसात भिजायला खूप आवडत असल्यामुळे दोन दिवसांचं हे शूटिंग तिच्यासाठी एखाद्या पावसाळी पिकनिकसारखंच होतं.

शूटिंगच्या ठिकाणी बेडूक आणि सापही होते. मात्र, त्यांचाही पूजाला काही त्रास झाला नाही. ‘मला पावसात भिजायला खूप आवडतं. त्यामुळे मला ना पावसाचा त्रास झाला, ना बेडूक आणि सापांचा. ही माझ्यासाठी एक पावसाळी पिकनिक होती,’ असं पूजाने सांगितलं.

पूजा सावंतच्या या आठवणींमुळे ‘अधीर मन झाले’ या गाण्याच्या शूटिंगमागची मेहनत आणि त्यावेळचा तिचा उत्साह पुन्हा एकदा समोर आला आहे. आजही या गाण्याची आठवण सांगताना पूजाच्या चेहऱ्यावर त्या शूटिंगचा आनंद दिसून येतो.

Rani Mukerji: मराठमोळ्या लूकमध्ये राणी मुखर्जीने वेधलं लक्ष; पुरस्कार स्वीकारताना मराठीत केली भाषणाची सुरुवात

Web Title: Pooja sawant adhir man jhale song shooting story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actress
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव
1

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?
2

Kakula Movie: भय अन् सूडाची थरारक कथा; काकुळ’मध्ये नेमकं कोणतं रहस्य दडलंय?

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा
3

Ashok Saraf Romantic Scene: अशोक मामांसोबत रोमँटिक सीन अन् समोर निवेदिता सराफ, ‘पछाडलेला’ फेम अभिनेत्रीने सांगितला आठवणीतला किस्सा

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!
4

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.