Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Sai Tamhankar: सई ताम्हणकरने ‘अडकित्ता’मधील मंगल या व्यक्तिरेखेबद्दल खास खुलासा केला. ‘मी स्वतःही लेअर पगलू’ म्हणत अभिनेत्रीने भूमिकेबद्दल सांगितलं. हा चित्रपट 11 सप्टेंबरपासून ZEE5 मराठीवर पाहता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 04, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sai Tamhankar: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच तिच्या आगामी ‘अडकित्ता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबरपासून ZEE5 मराठीवर पाहता येणार आहे. या चित्रपटात सईने ‘मंगल’ ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘अडकित्ता’मध्ये मंगल गौतम आणि कस्तुरी यांच्या आयुष्यात प्रवेश करते. काम आणि पालकत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने मंगल त्यांच्या आयुष्यात येते. मात्र, तिचं आणि गौतम-कस्तुरीच्या मुलाचं नातं पुढे जात असताना अनेक भावनिक गुंतागुंती निर्माण होतात. याच व्यक्तिरेखेबद्दल सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक खास गोष्टी सांगितल्या.

‘मंगल ही अनेक पदर असलेली व्यक्तिरेखा’

मंगलच्या व्यक्तिरेखेने आपल्याला आकर्षित केल्याचं सांगताना सई म्हणाली की, दररोज वेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत नाही. ज्या व्यक्तिरेखेसाठी कोणताही संदर्भबिंदू नसतो, अशी भूमिका साकारायला तिला आवडते.

सईच्या म्हणण्यानुसार, अशा व्यक्तिरेखेला अगदी सुरुवातीपासून घडवण्यात एक वेगळीच मजा असते. मंगल ही अनेक पदर असलेली व्यक्तिरेखा असून, “मी स्वतःही लेअर पगलू आहे,” असं सईने मिश्कीलपणे सांगितलं.

या चित्रपटासाठी होकार देण्यामागे दिग्दर्शकाशी असलेली अनेक वर्षांची मैत्री हे देखील एक कारण असल्याचं तिने सांगितलं. मित्रांसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच सुंदर असतो, असं सईने नमूद केलं.

‘केअरगिव्हर आणि मुलामध्ये भावनिक नातं निर्माण होणं स्वाभाविक’

‘अडकित्ता’मध्ये मंगल आणि अर्जुनचं नातं हळूहळू केअरटेकर आणि मुलाच्या नात्यापलीकडे जातं. आजच्या काळात अनेक काम करणारे पालक आपल्या मुलांच्या संगोपनासाठी केअरगिव्हर्सवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत मुलाचं केअरगिव्हरसोबत घट्ट भावनिक नातं निर्माण होण्याबाबत सईने आपलं मत मांडलं.

याबाबत स्वतःला वैयक्तिक अनुभव नसल्याचं सांगत सई म्हणाली की, एखाद्या मुलाशी भावनिकरित्या जोडले जाणं स्वाभाविक आहे. मुलं आणि बाळांमध्ये निरागस आणि प्रामाणिक ऊर्जा असते. त्यामुळे त्यांच्याशी निर्माण होणाऱ्या भावनिक नात्याला मर्यादा ठरवणं किंवा त्याचा हिशोब ठेवणं कठीण असतं.

ही परिस्थिती काहीशी गुंतागुंतीची असू शकते, मात्र पालकांच्या मनात केअरगिव्हरची भूमिका आणि तिचं पालकांसोबतचं नातं याबद्दल स्पष्टता असेल, तर विशेषतः दोन्ही पालक काम करत असतील, अशावेळी ही गोष्ट आशीर्वाद ठरू शकते, असंही सईने सांगितलं.

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश

‘असुरक्षित वाटणं स्वाभाविक; संवाद हाच मार्ग’

मुलाचं केअरगिव्हरसोबत घट्ट नातं निर्माण झाल्यानंतर काही पालकांना असुरक्षित वाटू शकतं किंवा मुलाच्या आयुष्यातील आपली जागा कमी होण्याची भीती वाटू शकते. याबाबत बोलताना सईने पालकत्वासाठी कोणतंही ठरावीक प्रशिक्षण मिळत नसल्याचं म्हटलं.

तिच्या मते, मूल ज्याप्रमाणे प्रत्येक नवीन गोष्ट शिकतं, त्याचप्रमाणे पालकही मुलासोबत पालकत्व शिकत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत असुरक्षित वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मात्र, त्यातून मार्ग काढण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे, असं सईचं मत आहे.

आपल्या भावना व्यक्त करणं गरजेचं आहे आणि संवाद कितीही कठीण वाटत असला तरी तो करायला हवा, असंही तिने सांगितलं.

‘मुलाच्या छोट्या-छोट्या क्षणांचा आनंद घेणं महत्त्वाचं’

पालकांनी आपल्या प्राधान्यक्रमांची जाणीव ठेवणं गरजेचं असल्याचं सईने सांगितलं. मुलाचं पहिलं पाऊल, पहिला शब्द यांसारखे छोटे पण महत्त्वाचे क्षण अनुभवणं पालकांसाठी विशेष असतं.

आजचे पालक मूल होण्याचा निर्णय अनेकदा विचारपूर्वक आणि नियोजन करून घेतात. त्यामुळे करिअर आणि पालकत्व यामध्ये समतोल साधण्यास त्यांना मदत होऊ शकते, असं सईने मत व्यक्त केलं.

Big Boss 20 Contestants: ‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

11 सप्टेंबरपासून ‘अडकित्ता’ पाहता येणार

सई ताम्हणकरची वेगळी भूमिका आणि आधुनिक पालकत्वाच्या विषयाभोवती फिरणारी कथा यामुळे ‘अडकित्ता’बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

11 सप्टेंबरपासून ‘अडकित्ता’ ZEE5 मराठीवर प्रदर्शित होणार असून, सई ताम्हणकरची ‘मंगल’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Web Title: Sai tamhankar adkitta movie mangal role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
1

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
2

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश
3

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट
4

Raja Shivaji TV Premiere: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ आता टीव्हीवर येणार; हिंदी-मराठीत पाहता येणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.