Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“न्यायाच्या संघर्षाची कहाणी उलगडणार”; ‘The Maharashtra Files’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता, दमदार संवादांनी वेधलं लक्ष

“ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘The Maharashtra Files’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 20, 2026 | 12:13 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘The Kashmir Files’ आणि ‘The Bengal Files’ यांसारख्या “फाइल्स” टायटलच्या चित्रपटांनंतर आता आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपट ‘The Maharashtra Files’चा ट्रेलर १८ मे रोजी रिलीज करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

“ही सरकारी फाईल आहे… दहा जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही…” अशा दमदार संवादाने सुरू होणाऱ्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘The Maharashtra Files’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठीच्या संघर्षाचे वास्तव उलगडणारा हा चित्रपट २९ मे २०२६ पासून महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटातून सरकारी यंत्रणेतील त्रुटी, निर्णय प्रक्रियेतील अडथळे आणि सामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रेलरमधील संवाद आणि दृश्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.आजच्या काळात काहीजण सरकारी यंत्रणांवर बोट ठेवतात, तर काहीजण त्यातील चुका लपवतात किंवा त्यांना घाबरतात. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.विशेष म्हणजे, बंजारा समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी मांडलेली ही भारतातील पहिली फिल्म असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये न्यायासाठी झुंज देणाऱ्या एका स्त्रीची व्यथा, व्यवस्थेतील दडपशाही, तसेच संघर्षामागचं सत्य प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी असून हा चित्रपट सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा ठरणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.


कागदाच्या ढिगाऱ्यांत लपलेलं सत्य येत्या २९ मे २०२६ पासून हा मोठ्या पडद्यावर उलगडेल. ‘द महाराष्ट्र फाईल्स’ची निर्मिती, दिग्दर्शन, लेखन, कथा, पटकथा अशी सर्व बाजूंनी चित्रपटाची धुरा संजीव कुमार राठोड यांनी सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह दिग्दर्शक आणि सह निर्माते म्हणून शालिनी राठोड यांनी बाजू सांभाळली आहे. तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून आर्यन राठोड याने बाजू पाहिली.

‘सपने वर्सेस एव्हरीवन 2’च्या यशानंतर Ambrish Vermaची भावनिक पोस्ट; Arunabh Kumar यांच्याबद्दल व्यक्त केल्या भावना

चित्रपटात दिग्गज कलाकार मंडळींची फौज

मराठी चित्रपट ‘The Maharashtra Files’मध्ये दिग्गज कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे.या चित्रपटात Usha Nadkarni, Mangesh Desai, Veena Jamkar, Sayaji Shinde, Nagesh Bhosale, Sunil Godse, Sunny Leone, Sapna Choudhary, Aryan Rathod, Gautami Patil आणि Mangli महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी Nitin Sawant, Ajit Ketkar आणि Siddharth Kasyap यांनी सांभाळली आहे.

“लग्नानंतर मुलींना सोडून दिलं जातं”; ट्विशा-दीपिका प्रकरणाने हादरली Kangana Ranaut, महिलांच्या आयुष्याबद्दल व्यक्त केली चिंता

 

Web Title: The trailer of the maharashtra files has increased excitement with powerful dialogues grabbing attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Gautami patil
  • marathi movie
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली
1

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
2

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता
3

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज
4

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.