Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आली लखाबाई’ गाण्यात अमृता धोंगडेचा रौद्रावतार; हितेश मोडकच्या संगीताने वेधलं लक्ष

लोकसंगीत आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेलं ‘आली लखाबाई’ गाणं सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. अमृता धोंगडेचा दमदार परफॉर्मन्स आणि हितेश मोडक यांचं संगीत यामुळे हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 08, 2026 | 04:10 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी संगीतविश्वात लोकसंगीत आणि आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम घडवणारं ‘आली लखाबाई’ हे नवं गाणं सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही तासांतच या गाण्याला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अभिनेत्री अमृता धोंगडे हिने साकारलेली ‘लखाबाई’ ही भूमिका विशेष लक्षवेधी ठरत आहे. तिचा मोहक अभिनय, दमदार नृत्य आणि हटके लूक यामुळे गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. विशेषतः तिचा रौद्रावतार प्रेक्षकांना भावतो आहे.

संगीतकार हितेश मोडक यांनी या गाण्याला दिलेलं संगीतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ग्रामीण संस्कृतीचा ठसा जपत उत्सवमय वातावरण आणि पारंपरिक लोककलेचा रंग या गाण्यात प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

गाण्याची ठेकाधारी रचना, आकर्षक शब्दरचना आणि भव्य चित्रीकरण यामुळे ‘आली लखाबाई’ प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडत आहे. याआधीही हितेश मोडक यांच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला असून हे नवं गाणंही त्या यशाची पुनरावृत्ती करताना दिसत आहे.

एकूणच, ‘आली लखाबाई’ हे गाणं मराठी संगीतविश्वात नवा ट्रेंड सेट करत असून प्रेक्षकांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

गाण्याबाबत बोलताना हितेश मोडक म्हणाले, “‘राजा राजा’ नंतर ‘आली लखाबाई’ला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. या गाण्यातील लोकसंगीताचा ठेका, आकर्षक चित्रीकरण आणि अमृता धोंगडेचा दमदार परफॉर्मन्स प्रेक्षकांना विशेष आवडत आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम आम्हाला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल. हे गाणं नक्कीच प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळेल, असा विश्वास आहे.”


कंगना रणौतला नर्सेसचा युनिफॉर्म का खटकतोय? भारत भाग्य विधाता’च्या रिलीजपूर्वी उपस्थित केला मुद्दा

या गाण्यात निर्माती आणि अभिनेत्री अशा दुहेरी भूमिकेत दिसणारी अमृता धोंगडे म्हणाली, “‘आली लखाबाई’ माझ्यासाठी खूप खास आहे. अभिनयासोबतच निर्मितीची जबाबदारीही सांभाळण्याची संधी मला मिळाली. या संपूर्ण प्रवासात आम्ही खूप मेहनत घेतली असून त्याचा सकारात्मक परिणाम प्रेक्षकांच्या प्रतिसादातून दिसत आहे. माझा रांगडा, रौद्रावतार आणि पारंपरिक लूक प्रेक्षकांना आवडत असल्याचं पाहून खूप आनंद होतो.”

या गाण्यात अमृतासोबत नॉयरिका भतीजा, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि बालकलाकार आरोह धोंगडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सचिन कांबळे यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून सौरभ साळुंखे आणि ईश्वरी बाविस्कर यांनी गाण्याला आवाज दिला आहे.

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ची जोरदार कमाई! रिलीजआधीच 120 कोटींची उलाढाल, अक्षय कुमारच्या मानधनाची चर्चा

गावाकडच्या संस्कृतीचा सुगंध, नृत्याची ऊर्जा आणि संगीताची जादू यांचा संगम असलेलं ‘आली लखाबाई’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून संगीतप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.

Web Title: Amruta dhongades fierce avatar in aali lakhabai song hitesh modaks music grabs attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
1

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
3

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं
4

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.