Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Afratafri Marathi Movie Trailer: ‘अफरातफरी’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एक कोटी रुपयांसाठी तीन भावांची धडपड, विनोद आणि गोंधळाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 10:10 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एक कोटींची रक्कम अन् तीन भावांचे वेगवेगळे डाव
  • अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज
  • ९ ऑक्टोबरला चित्रपट होणार रिलीज
Afratafri Marathi Movie Trailer:  एक कोटी रुपयांची रक्कम समोर आली की नात्यांमध्येही गणितं बदलू शकतात… आणि हीच रक्कम तीन भावांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनली तर गोंधळ होणारच! असाच भन्नाट गोंधळ घेऊन येणाऱ्या ‘अफरातफरी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये पैशांचा मोह, गैरसमज, युक्त्या आणि तीन भावांची सुरू असलेली धावपळ पाहायला मिळत असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

एक कोटींसाठी तीन भावांची धडपड

‘अफरातफरी’च्या ट्रेलरमध्ये एक कोटी रुपये मिळवण्यासाठी तीन भाऊ कोणकोणत्या खेळी खेळतात, याची झलक पाहायला मिळते. एका बाजूला मोठी रक्कम मिळवण्याची धडपड आहे, तर दुसरीकडे परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे डाव आखताना दिसतो.

पैशांच्या हव्यासापायी तीन भावांमध्ये नेमकं काय घडतं? तिघेही एकाच दिशेने धावत आहेत की प्रत्येकाचा वेगळाच डाव आहे? या प्रश्नांची उत्सुकता ट्रेलर पाहिल्यानंतर आणखी वाढते.

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

तात्यांच्या मृत्यूचं रहस्य काय?

ट्रेलरमध्ये कथेशी संबंधित अनेक गोष्टींचे संकेत देण्यात आले आहेत, मात्र त्यांची उत्तरं मात्र गुप्त ठेवण्यात आली आहेत. तात्यांच्या मृत्यूमागचं खरं सत्य काय? एक कोटींची पॉलिसी खरंच भावांच्या हातात येणार का? पैशांसाठी सुरू झालेली ही धावपळ कुठे जाऊन थांबणार? आणि या सगळ्या खेळात कोण कोणाला गंडवणार?

या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.

विनोद आणि गोंधळाची रंगत

शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या व्यक्तिरेखांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

कलाकारांचे संवाद, गैरसमज आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधून निर्माण होणारा विनोद चित्रपटाच्या गोंधळात आणखी रंग भरताना दिसतो. मात्र या सगळ्या हास्याच्या मागे एक प्रश्न कायम राहतो—एक कोटींची रक्कम अखेर कुणाच्या पदरात पडणार?


दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे काय म्हणाले?

दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे म्हणाले, “टिझरमधून आम्ही ‘अफरातफरी’ची सुरुवात दाखवली होती, तर ट्रेलरमधून या गोंधळामागची खरी गंमत आणि पात्रांची धावपळ थोडी अधिक उलगडते. एक कोटी रुपयांची रक्कम ही या कथेतील प्रत्येकाच्या निर्णयाला वेगळी दिशा देते. प्रत्येक पात्राला वाटतंय की आपला डाव बरोबर आहे, पण या सगळ्या डावपेचांचा शेवट नेमका कुठे होतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.”

पुढे ते म्हणाले, “प्रेक्षकांनी ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे एक कोडं म्हणून पाहावं, कारण पुढच्या क्षणी काय घडेल, याचा अंदाज लावणं तितकंच मजेदार आहे. या गोंधळात प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

९ ऑक्टोबरला चित्रपट होणार रिलीज

मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित ‘अफरातफरी’ची निर्मिती अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केली आहे. आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘अफरातफरी’ ९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता एक कोटी रुपयांसाठी सुरू झालेल्या या गोंधळाचा शेवट नेमका कसा होतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा आहे.

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Web Title: Afratafri marathi movie trailer release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Official Trailer

संबंधित बातम्या

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक
1

Yami Gautam: यामी गौतमच्या शिरपेचात मानाचा तुरा; पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळताच पती आदित्य धर भावूक

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
2

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात
3

‘Pehla Pyaar Dusse Baar’ Trailer Release: जुनं प्रेम, नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर रिलीज; ‘या’ तारखेला सिनेमागृहात

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
4

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.