Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankarshan Karhade Son: रंगमंचावर बाबांची एन्ट्री होताच टाळ्या वाजवल्या अन्…; संकर्षण कऱ्हाडेच्या लेकाचा ‘हा’ Video एकदा पाहाच!

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या 'कुटुंब किर्रतन' नाटकाच्या प्रयोगात रंगमंचावर बाबांची एन्ट्री होताच संकर्षणच्या चिमुकल्या मुलाने आनंदाने टाळ्या वाजवत दिलेली निरागस प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 27, 2026 | 08:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे सध्या त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’ , नियम व अटी लागू या नाटकांमुळे चर्चेत आहे. या नाटकांच्या निमित्ताने तो महाराष्ट्रभर दौरे करत आहे. अनेकदा परदेशांतही या नाटकांचे प्रयोग होतात. नाटकाच्या प्रयोगांनतर अनेक प्रेक्षक कलाकरांच्या भेटीला येत असतात. भेट घेऊन आपल्या भावना शब्दातून व्यक्त करतात तर काही वेळा कलाकरांसाठी खास भेटवस्तू आणतात.

संकर्षण कराडे नेहमी सोशल मीडियावर काही खास आठवणी, किस्से शेअर करताना दिसतो. नुकताच अभिनेता संकर्षण कराडेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुटुंब कीर्रतन या नाटकाचा प्रयोग सुरू आहे. त्याचा मुलगा सर्वज्ञ आणि लेक स्त्रग्वी आईजवळ बसल्याचे दिसत आहे. सर्वज्ञ आईच्या मांडीवर नाटक पाहायला बसला आहे. जेव्हा संकर्षणची एन्ट्री होते, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर उत्साह, डोळ्यांत आनंद पाहायला मिळतो. नाटकात बाबाची एन्ट्री होताच संकर्षणचा लेक आनंदाने टाळ्या वाजवतो. बाबाला पाहून सर्वज्ञचा चेहरा आनंदाने खुलतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Hemant Dhome Poet: “गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप…” हेमंत ढोमेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करताना संकर्षण कऱ्हाडेने लिहिले, “‘कुटुंब किर्रतन’च्या प्रयोगात बाबांची एन्ट्री झाल्यावर आम्हाला काय आनंद झालाय बघा. पोराच्या डोळ्यात बापाचं कौतुक… असंच कौतुकाने पाहण्याची संधी पुढे बापालाही मिळाली, की ‘बापाचा रोल जमला’ म्हणायचं. बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते!”

संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. त्याच्या भावनिक शब्दांनी अनेकांना आपलेपणा जाणवला. “अगदी खरं लिहिलं आहे,” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर “तुझा मुलगा अगदी तुझी फोटोकॉपी आहे,”, “बापासारखाच मुलगा,” आणि “खरंच किती गोड आहे!” अशा कमेंट्सनी पोस्टचा कमेंट बॉक्स भरून गेला. एका चाहत्याने “किती बोलके डोळे आहेत… पुढे जाऊन नक्कीच मोठं नाव कमावेल,” असे म्हणत सर्वज्ञचे कौतुक केले.

‘तारिणी’ मालिकेच्या टीमचे स्वादिष्ट स्वागत! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या रेस्टोरंटमध्ये घेतला नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद

Web Title: Sankarshan karhade son applauds as actor makes his entry in kutumb kirrtan adorable viral video wins hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • sankarshan karahade

संबंधित बातम्या

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल
1

Ramayana Song: ‘जय जय राम’च्या मंगल स्वरांनी घुमला श्रीरामांचा जयघोष; ए. आर. रहमान यांच्या संगीताने रंगली भक्तिमय मैफल

Ganesh Chaturthi 2026:जुबीन गर्ग यांच्या आठवणीत गणरायाची भव्य मूर्ती; गणेश चतुर्थीला आयोजकांचा अनोखा उपक्रम
2

Ganesh Chaturthi 2026:जुबीन गर्ग यांच्या आठवणीत गणरायाची भव्य मूर्ती; गणेश चतुर्थीला आयोजकांचा अनोखा उपक्रम

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल
3

Shilpa Shetty Ganesh Chaturthi: शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचं आगमन; जयघोषात केलं गणरायाचं स्वागत, VIDEO व्हायरल

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी
4

Mary Kom Statement : मैरी कॉमच्या ‘त्या’ कमेंटवरून वाद; सानिया मिर्झा-सायना नेहवालवर बोलणं पडलं महागात, टीमने मागितली माफी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.