Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ वर्षांचं नातं अन् एका फोनवर मोडला साखरपुडा; लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा १२ वर्षांनी धक्कादायक खुलासा

Sangram Samel : मराठी अभिनेता संग्राम समेळने २०१४ मध्ये मोडलेल्या साखरपुड्याचा आणि १५ वर्षांच्या नात्याचा भावनिक खुलासा केला. वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगात सहकलाकारांनी दिलेल्या साथीचीही त्याने आठवण सांगितली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 12:07 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

sangram samel: मनोरंजनविश्वातील कलाकारांचं आयुष्य बाहेरून जितकं ग्लॅमरस आणि सुखी दिसतं, तितकंच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आणि वेदनादायी अनुभव दडलेले असतात. पडद्यावर कायम हसतमुख राहून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे कलाकार अनेकदा स्वतःच्या दुःखावर पडदा टाकत काम करत असतात. मनात भावनांचं वादळ सुरू असतानाही कॅमेऱ्यासमोर हसत उभं राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशाच एका कठीण प्रसंगाचा खुलासा अभिनेता संग्राम समेळने नुकताच केला असून, त्याच्या आयुष्यातील हा भावनिक अनुभव ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

संग्राम कोणत्या भूमिकेमुळे नाही तर सध्या तो त्याच्या आयुष्यातील धक्कादायक प्रसंगामुळे चर्चेत आहे. अलिकडेच अभिनेत्याने कलाकार या युट्यूब चॅनेलाल मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यातील काही खुलासे केले आहेत.

या मुलाखतीत दरम्यान त्याला विचारण्यात आले की, असं कधी घडलाय का, की तुझ्या आयुष्यात खूप दुःख असतानाही हसून लोकांना सामोरे जाण्याची वेळ त्याच्यावर कधी आली आहे का ? यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, प्रत्येक अभिनेत्याच्या जीवनात असा प्रसंग नक्कीच येतो.

या संदर्भात त्याने २०१४ मधील एक अत्यंत कटू आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. पुढे संग्राम म्हणाला, ” मला एक किस्सा कायम लक्षात राहील, 2014 ची गोष्ट आहे. जेव्हा माझी पुढचं पाऊल ही मालिका सुरू होती. त्यावेळी हर्षदाताई, मृणालताई यांनी मला शिकवलं की, जे आपलं युनिट असतं, ते आपलं कुटुंब असते. त्या मालिकेच्या वेळी त्यांनी मला आधार दिला. 2014 ला माझा साखरपुडा मोडला. माझं 15 वर्षांचे रिलेशनशिप होते. आमचं एका कॉलवर नातं मोडलं आहे. मुलगी आणि तिच्या घरचे माझ्या घरी येणार होते. सगळी देणी- घेणी परत करायचं होतं. माझं त्याच दिवशी शूटिंग होते. मी सुट्टी घेतली नाही. कारण सगळ संपलंच आहे, तर घरी बसून काय करू? त्याच दिवशी मालिकेच्या सेटवर त्याला डान्स सीक्वेन्सचं शूटिंग करायचं होतं. वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ सुरू असताना कॅमेऱ्यासमोर हसून अभिनय करणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण होतं. त्यातच, “मला डान्स येत नाही,” अशी भीतीही त्याच्या मनात होती. त्यामुळे वैयक्तिक आयुष्याचं दुःख आणि शूटिंगचं दडपण अशा दुहेरी तणावाला त्याला सामोरं जावं लागलं.

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

मात्र, मालिकेच्या टीमने त्याची खंबीर साथ दिली. सहकलाकार अभिजीत केळकरसह संपूर्ण टीम त्याला सतत प्रोत्साहन देत होती. सेटवरील वातावरण हलकंफुलकं ठेवण्यासाठी ते विनोद करत होते, जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो त्या प्रसंगातून सावरू शकेल. “ते माझ्यासाठी कुटुंबासारखेच होते. त्यांनी मला त्या कठीण दिवसातून बाहेर पडण्याची ताकद दिली. त्यामुळे तो दिवस आणि त्यांची साथ मी आयुष्यभर विसरणार नाही,” अशी भावना सागर समेळने व्यक्त केली.

Riteish Deshmukh : ‘तू मला शिकवू नकोस…’; ‘lock upp 2’मध्ये रितेश देशमुखचा राग अनावर, ‘या’ स्पर्धकाला दिला इशारा

Web Title: A 15 year relationship a broken engagement and a smile on set marathi actor sangram samel opens up emotionally after 12 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार
1

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
2

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.