Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई तुळजाभवानी’मध्ये रंगणार महादेव-तुळजाभवानीचा भव्य विवाहसोहळा; १५० हून अधिक कलाकार, भव्य सेट अन् दिव्य सजावट

कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत सध्या तुळजाभवानी आणि महादेवांचा भव्य दिव्य विवाहसोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना’ विशेष पर्व २८ एप्रिल ते २८ मे दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 21, 2026 | 12:07 PM
‘आई तुळजाभवानी’मध्ये रंगणार महादेव-तुळजाभवानीचा भव्य विवाहसोहळा; १५० हून अधिक कलाकार, भव्य सेट अन् दिव्य सजावट

‘आई तुळजाभवानी’मध्ये रंगणार महादेव-तुळजाभवानीचा भव्य विवाहसोहळा; १५० हून अधिक कलाकार, भव्य सेट अन् दिव्य सजावट

Follow Us
Follow Us:
  • लग्नघटिका समीप ! तुळजाई – महादेवाच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना !
  • तब्बल २ महिने सुरु आहे शूट ! अलंकार, आभूषणांनी सजला आहे थाट…
  • १५० हून अधिक कलाकार, भव्य सेट अन् दिव्य सजावट
Aai Tuljabhavani Marathi Serial News Marathi : कलर्स मराठी मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत सध्या तुळजाभवानी आणि महादेवांचा लग्नसोहळा आणि त्याच्या संदर्भातले विधी मोठ्या जल्लोषात सुरु आहेत. हा विवाह संपूर्ण त्रिखंडातील अभूतपूर्व आणि भव्य दिव्य सोहळा ठरणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी अखिल देवी-देवता, ब्रह्मा, विष्णूंसह तिन्ही खंडातील ऋषी-मुनी, योग-योगिनी यांचा दिव्य लवाजमा पाहायला मिळणार आहे. जवळपास १५० ते १७५ कलाकार आणि तंत्रज्ञांचा मोठा क्रू, जवळपास २ महिन्यांपासून या सोहळ्यासाठी कार्यरत आहे. सौंदर्याची खास ओळख ठरणाऱ्या विविध रंगसंगतीच्या मनमोहक ४०-४५ आकर्षक उंची साड्या, पारंपरिक दागदागिने तसेच भव्य सेट आणि सजावट यामुळे हा सोहळा अधिक दिमाखदार होणार आहे. ‘अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना’ म्हणून रंगणाऱ्या या विशेष पर्वात देवी आणि महादेवांच्या विवाहाची बातमी त्रिलोकात पसरते आणि हा विवाह सृष्टीच्या संतुलनाचा क्षण मानला जातो. आई तुळजाभवानी – विवाह सोहळा विशेष महिना २८ एप्रिल ते २८ मे दररोज रात्री ९ वाजता आपल्या कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

Veen Doghantli Hi Tute Na : समर-स्वानंदीच्या आयुष्यात आली आणि १५ दिवसांतच गेली! Purva Gokhale ची पोस्ट चर्चेत

या विवाहासाठी वैकुंठातून विष्णू आणि लक्ष्मी महालात येतात. वधूसारखी सजलेली देवी पाहून लक्ष्मी आनंद व्यक्त करते, तर विष्णू पुढील संघर्षाची अप्रत्यक्ष चाहूल देतात. या दरम्यान महादेवांना मिळणारे आदिशक्तीचे गूढ संकेत, आदिशक्तीने या संकेतांचा अज्ञात ठेवलेला अर्थ, महिषासुराची देवीच्या आश्रयास आलेली पत्नी असुर सम्राज्ञी शुंभाचे हळूहळू उघडकीस येणारे कारस्थान, देवीची वाड्यातून बहिष्कृत केलेली सखी पद्माचा एका दुसऱ्या शक्तीच्या शोधाचा प्रवास या साऱ्या नाट्यमय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अनेक मनमोहक भव्य विवाहविधी संपन्न होत आहेत, यात देवीच्या हातात चुडा भरण्याचा कार्यक्रम विशेष ठरणार असून देवीच्या हातात प्रत्यक्षात हा चुडा कोण भरते, हे रहस्य प्रेक्षकांना चकित करणारे असेल. त्यानंतर देवीचा मांडव उभारण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून समस्त शक्तीरुपिणी देवींद्वारे उभे केले जाणारे प्रतिरक्षा शक्ति कवच हे अद्भुत नयनरम्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच इतके भव्य ग्राफिक्स साकारले जाते आहे.

या विवाहसोहळ्यात हळदीच्या विधीत यमाई, मायाक्का, काळुबाई, आंबेजोगाई आणि मळगंगा सहभागी होत भव्य नृत्य-गायनाचा सोहळा रंगतो. मात्र, इथून एक नव्या दैवी अध्यायाचे रहस्य उलगडू लागते. हळद, महादेवांचं वऱ्हाड आणि प्रत्यक्ष लग्न यात उलगडणारे हे रहस्य एका वेगळ्या दैवी अनुभवाचा प्रत्यय प्रेक्षकांना देईल, ज्याला एका भव्य साग्रसंगीत विवाहसोहळ्याची जोड आहे. तेव्हा नक्की पहा आणि अनुभवा आई तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना !

मकरंद माने (मालिकेचे निर्माते – लेखक) याविषयी बोलताना म्हणाले, “आई तुळजाभवानीच महात्म्य दृश्य स्वरुपात साकारण्याच कार्य आम्हा सर्व टीमला मिळाले हे आमचे खूप मोठे भाग्य आहे. गेले ५००-६०० भागांचा टप्पा पूर्ण केला आणि आता आई तुळजाभवानी महात्म्य मधील महत्वाच्या टप्प्यावर आपण आहोत ते म्हणजे लग्न विधी. ह्या संपूर्ण लग्न सोहळा मांडताना विशेष आनंद पण होतो आणि दडपण पण येतय की आपण ह्या सोहळ्याला पूर्ण न्याय द्यायला हवा. त्या दिशेने काम करताना एक वेगळा संचार संपूर्ण टीममधे आहे. गेले दोन महिने चॅनेल आणि प्रॉडक्शन टीम दिवसरात्र सर्वजण झपाटल्यासारखे काम करत आहेत. लग्नाचा काळ हा पौराणिक काळ आहे त्यामुळे प्रत्येक विधी हा अभ्यासपूर्वक करण्याचा आमचा ध्यास आहे. संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आईचा महिमा तेवढाच भव्य असण्याकडे जाणीवपूर्ण लक्ष दिले जात आहे.

हे साकारणाऱ्या कलाकारांची साथ तेवढीच मोलाची ठरते आहे. आता सेटवर जणू लग्नघर असल्याचा माहोल आहे. जो-तो उत्साहाने, जबाबदारीने आपली-आपली कामे पार पाडतो आहे. मी स्वतःला नशीबवान समजतो आहे की ह्या मालिकेचा मी एक भाग आहे. आपली असलेली आईराजावरची श्रद्धा आणि तिची अश्या पद्धतीने भक्ती करण्याचं सौभाग्य मिळतय ह्या पलीकडे आयुष्यात अजून काय साध्य करायचे. हा भव्य दिव्य लग्नसोहळा आई चरणी आम्ही अर्पण करत आहोत.” या भव्य विवाह सोहळ्याचे साक्षीदार होऊया, आई तुळजाभवानी २८ एप्रिल ते २८ मे ,दररोज रात्री ९ वाजता आपल्या कलर्स मराठीवर नक्की पाहा…

आर माधवनचा संतापाचा चढला पारा! परवानगीशिवाय व्हिडिओ वापरल्याने अभिनेत्याने हेल्थ ब्रँडला चांगलचं झापलं; थेट बजावली लीगल नोटीस

Web Title: Aai tuljabhavani mahadev marriage special month colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Aai Tuljabhavani
  • colors marathi
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
1

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
2

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
3

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
4

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.