Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

'आई तुळजाभवानी' मालिकेत 'दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना' सुरू होत आहे. पाताळदेवीविरुद्ध तुळजाईचा महासंग्राम, चार दुष्ट विकारांविरुद्धचा लढा आणि 'दिव्य स्वस्तिकाचा' महिमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 30, 2026 | 02:01 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये प्रेक्षकांना जुलै महिन्यात एक भव्य आणि दैवी पर्व अनुभवायला मिळणार आहे. ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’ या विशेष कथानकातून मानवी मनाला ग्रासणाऱ्या अकालमृत्यू, भय, चिंता आणि व्यसन या चार भयंकर विकारांविरुद्ध आई तुळजाई घनघोर युद्ध पुकारताना दिसणार आहे.

आदिशक्तीचे पवित्र प्रतीक मानल्या जाणाऱ्या ‘दिव्य स्वस्तिकाचा’ महिमा उलगडत ही कथा भक्ती, श्रद्धा आणि दुष्ट शक्तींविरुद्धच्या संघर्षाची नवी दिशा दाखवणार आहे. या विशेष अध्यायात दैवी शक्ती आणि आसुरी प्रवृत्ती यांच्यातील महासंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

पाताळदेवीचा कट आणि तुळजाईचा निर्णायक लढा

कथानकानुसार, आगामी चातुर्मासात संपूर्ण भुलोकावर विकारांचे साम्राज्य निर्माण करण्याच्या उद्देशाने पाताळातील अघोरी आदिम शक्ती ‘पाताळदेवी’ जागृत होते. आपल्या साथीदार भुजंगाच्या माध्यमातून ती एका निष्पाप कुटुंबाला लक्ष्य करत मानवी मनाला कैद करणाऱ्या चार विकारांचा प्रसार करण्याचा कट रचते.

दरम्यान, अवकाशात प्रकट झालेल्या ‘दिव्य स्वस्तिका’तील ताऱ्यांचे तेज लोकांच्या सत्कर्मामुळे अधिक प्रखर होत असते. मात्र, हे तेज कायमचे विझवण्यासाठी पाताळदेवी आपला पहिला डाव खेळते. या अभूतपूर्व संकटामुळे दैवी आणि आसुरी शक्तींमध्ये महासंग्रामाची ठिणगी पडते आणि आई तुळजाभवानी दुष्ट शक्तींविरुद्ध निर्णायक लढा उभारते.

Samir Paranjape Restaurant: अभिनेता समीर परांजपेचं व्यवसाय क्षेत्रात पहिलं पाऊल, ‘या’ शहरात सुरू केलं ‘परांजपे उपहार गृह’

“संकटं नाहीशी नाही, तर त्यांच्याशी लढण्याची शक्ती द्यायची”

या कथानकातील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे आई तुळजाभवानीची भूमिका. ती आपल्या भक्तांना संकटांपासून दूर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर मात करण्याची ताकद देण्याचा निर्धार व्यक्त करते.

“मला भक्तांची संकटं नाहीशी करायची नाहीत, तर त्यांना संकटांवर मात करण्याची शक्ती द्यायची आहे,” हा तिचा खणखणीत संदेश प्रत्येक प्रेक्षकाला नवा आत्मविश्वास देणारा ठरणार आहे.

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

आता पाताळदेवीच्या मायावी शक्तींना आई तुळजाभवानी कशा प्रकारे पराभूत करणार? भाग्यकुंभावर उमटणारं ‘स्वस्तिक’ कोणते नवे चमत्कार घडवणार? आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी तुळजाई कोणती दिव्य शक्ती प्रकट करणार? याची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

Web Title: Aai tuljabhavani serial divya swastika decisive month begins goddess tulja bhavani to wage a divine battle against four evil forces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
1

Legacy: KR$NA आणि Raftaarचा रॅप रिअॅलिटी शो आता हिंदी ZEE5 वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा
2

Zimmad: पावसाच्या सरीत रंगला मराठी कलाकारांचा ‘झिम्माड’ जल्लोष; गाणी, कविता अन् जुन्या आठवणींना उजाळा

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
3

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’
4

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी ‘तारिणी’ची नवी मोहीम; स्वातंत्र्यदिन विशेष आठवड्यात सुरू होणार ‘ऑपरेशन तिरंगा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.