(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठीचा लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन ६ हा अंतिम टप्प्यात आला आहे. लवकर बिग बॉस मराठी सीझन ६ चा विजेता कोण हे अख्या महाराष्ट्राला समजणार आहे. नुकतीच बिग बॉसच्या घरातून रेवा घराबाहेर पडली. यामुळे आता घरात एकूण ५ स्पर्धक राहिले आहे. बिग बॉसला टॉप पाच फायनलिस्ट जाहीर झाले आहेत. त्यामुळे विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. बिग बॉस मराठीचा अंतिम सोहळा जवळ आला असून प्रत्येक स्पर्धकाचे चाहते त्यांच्या स्पर्धकाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. अशातच आता तारक मेहता का उल्टा चश्मा फेम अभिनेत्याने दिपाली सय्यदला पाठिंबा दिला आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेत गेली अनेक वर्ष कृष्णन अय्यर हे पात्र साकारणारा अभिनेता तनुज महाशब्देने याने व्हिडिओ शेअर करत दिपाली सय्यदला पाठिंबा दिला आहे. अभिनेता नेहमी खूप सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असतो. अशातच त्याने व्हिडिओ पोस्ट करून दिपाली बद्दल बोलला आहे.
तनुजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “नमस्कार मी तनुज महाशब्दे बिग बॉसमधील दिपाली सय्यद या माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत. त्या समाजसेविका आहेत आणि उत्कृष्ट राजकारणीसुद्धा आहे. त्यांनी या समाजाला खूप काही दिलं आहे. आता आपण त्यांना व्होट करुन शो जिंकण्यासाठी मदत करावी अशी मी विनंती करतो. मी व्होट केलेलं आहे आता तुम्हीसुद्धा लगेचच त्यांना व्होट करा. दिपाली मॅम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.”
‘Bigg Boss Marathi’ सीझन ६ चा अंतिम टप्पा आता रंगतदार झाला असून विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने यांचा समावेश आहे.या सर्व स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत असून प्रेक्षकांमध्ये विजेत्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अंतिम भागातच कोण ट्रॉफी उचलणार हे स्पष्ट होणार असल्याने शोचा थरार अधिक वाढला आहे.






