Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘मोहिनी’ मधील महेंद्र आणि माझ्या स्वभावात खूपच साम्य, भूमिका करणं सोपं झालं – शंतनू मोघे

कलर्स मराठीवरील मोहिनी मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर ‘मोहिनी’ घालतेय. या मालिकेत महेंद्र ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे शंतनू मोघे यांनी. याबाबतच खास मुलाखत नक्की वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 24, 2026 | 12:47 PM
मोहिनी मालिकेतील महेंद्र ऊर्फ अभिनेता शंतनू मोघेची खास मुलाखत

मोहिनी मालिकेतील महेंद्र ऊर्फ अभिनेता शंतनू मोघेची खास मुलाखत

Follow Us
Close
Follow Us:

सेटवरच जन्मलेली, मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करताना चुकून हिरोईन समजली गेलेली मोहिनी, तिच्या स्मार्टनेसने सतत परिस्थिती हाताळताना दिसते. पण तिला खंबीरपणे घडवणारा तिचा बाप म्हणून अभिनेता शंतनू मोघे याने ‘महेंद्र’ ही व्यक्तिरेखा अत्यंत सहजपणाने साकारली आहे. कोणत्याही भूमिकेत चपखल बसणारा अशा शंतनूने नवराष्ट्रशी या भूमिकेबाबत खास गप्पा मारल्या. शंतनूशी बोलताना जाणवलं की, उपजातच एखाद्यामध्ये प्रेमाचा झरा असतो असा तो आहे आणि त्यामुळेच ही वडिलांची भूमिका त्याने अगदी कमी वेळात आपलीशी करून घेतली आहे. मोहिनी मालिकेतील त्याचे सीन्स पाहताना आपले वडीलही असेच असावेत असं नक्कीच प्रत्येक मुलीला वाटेल. धाकापेक्षा मित्र म्हणून असणारे वडील, कधी हळवे तर कधी भक्कम अशी ही भूमिका प्रेक्षकांना कमालीची भावली आहे. 

शंतनूला जेव्हा विचारलं की, तू ही भूमिका का स्वीकारलीस आणि या भूमिकेची कशी तयारी केलीस, त्यावर त्याने अगदी सहजपणे म्हटलं की, ‘माझी कोणतीही भूमिका निवडण्यामागे एकच निकष असतो. कोणतीही भूमिका करताना ती महत्त्वाची हवी. उगीच मालिकेत काम करत आहे असं कुठेच वाटायला नको आणि महेंद्रच्या या भूमिकेला खूपच वेगवेगळे कंगोरे आहेत. कुटुंबप्रधान असणारा हा माणूस अत्यंत हळवा आहे. शालिनी, मुली आणि बहिणीच्या बाबतीत तो खूपच हळवा आहे. या भूमिकेत दुःख, यश, आनंद, अपमान या सर्वच बाजू दाखविण्याची संधी असल्याने ही भूमिका स्वीकारली आणि काम करताना खूपच मजा येत आहे. खरं तर मानवी भावनांची प्रत्येक बाजू या भूमिकेतून दाखवता येत आहे आणि त्यामुळेच ही भूमिका मला आवडली आणि मी होकार दिला.’

तुझ्याकडे पाहताना ही भूमिका तुझ्यासाठीच असावं वाटतं, तर महेंद्र आणि शंतनूमध्ये काही साम्य आहे का? हा प्रश्न विचारताच क्षणाचाही विलंब न करता शंतनूने सांगितलं की, ‘मी माझ्या आयुष्यात जसा आहे ना अगदी तसाच महेंद्र आहे. मी एखाद्याला माझं माणूस मानलं ना की कधीच हात आखडता घेत नाही. त्यांच्यासाठी पूर्ण झोकून देतो आणि महेंद्रही तसाच आहे. देव मानतो नास्तिक नाही पण कर्मकांडावर विश्वास नाही आणि मालिकेतील सीनमध्येही तुम्हाला तसंच दिसून आलं असेल. जसा मी आयुष्यात भक्कम विचारधारा घेऊन चालतो तसाच महेंद्रदेखील दाखवला आहे आणि त्यामुळे ही भूमिका करताना मला काहीच जास्त करावे लागले नाही. कारण मी जसा खऱ्या आयुष्यात आहे या भूमिकेसाठीही अगदी फक्त संवाद पाठ करून तसाच दिसतो.’

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शंतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत

ही भूमिका एका स्टंट आर्टिस्टची आहे तर डाएटची काही विशेष काळजी घेतली आहेस का? यावर शंतनू म्हणाला की, ‘स्टंट करताना खूप मजा येते आणि कोणत्याही कलाकाराला भूमिका साकारताना पडद्यावर योग्य दिसण्यासाठी हेल्दी डाएट कायम पाळणं गरजेचे आहे. मी गेली अनेक वर्ष नित्यनियमाने जिम करतोय. माझी अंगकाठी एकदम अशी आहे की, या भूमिकेसाठी ती चपखल बसली आहे कारण मी फाईट मास्टर दिसतो. पहिल्यापासूनच मी कायम डाएट पाळतो. त्यामुळे या भूमिकेसाठी मला काही वेगळं करावं लागलं नाही, ही जमेची बाजू आहे. कारण मालिका करताना तितका अवधी मिळत नाही.’

महेंद्रची भूमिका साकारताना काही आव्हानं वाटली का? याचं उत्तर शंतनूने देताना म्हटलं की, ‘आव्हानात्मक म्हणजे काहीतरी वेगळी मेहनत करावी लागते आणि मी जसा आहे तशीच ही भूमिका आहे त्यामुळे वेगळी मेहनत मला करावी लागली नाही. जेव्हा मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो तेव्हा ते मला आव्हानात्मक वाटतं. महेंद्र ही भूमिका एका प्रेमळ वडिलांची आहे आणि मला तो वारसा माझ्या आई-वडिलांकडून मिळाला आहे. त्यामुळे कठोर वडिलांची भूमिका नाही तर हा एक प्रेमळ बाप आहे जे माझ्यासाठी अधिक सोपं आहे. याचं संपूर्ण श्रेय मी संवाद लिहिणाऱ्यांना आणि स्क्रिनप्लेसाठी देतो. त्यांनी ही भूमिका इतकी छान लिहिली आहे की ती साकारताना मजा येत आहे’

याशिवाय प्रेक्षकांची प्रतिक्रियाही मला प्रचंड प्रमाणात मस्त मिळत आहे आणि ही भूमिका त्यांना आवडत आहे हे पाहून कामाला अधिक हुरूप येतोय. यामुळेच प्रेक्षकांनाही बाप – मुलीच्या नात्यातील ही गुंफण आवडत आहे. 

‘मोहिनी’ मालिका निर्णायक वळणावर, बाप-लेकीच्या भेटीत उलगडणार का जन्मदात्याचा क्रूर चेहरा!

Web Title: Actor shantanu moghe shared his thoughts about role in mohini serial from colors marathi exclusive interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • colors marathi
  • New Marathi Serial
  • Shantanu

संबंधित बातम्या

दिव्य सोहळ्याची पर्वणी, आई तुळजाभवानी’ मालिकेत रंगणार महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत विवाहसोहळा
1

दिव्य सोहळ्याची पर्वणी, आई तुळजाभवानी’ मालिकेत रंगणार महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत विवाहसोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.