Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षेचा निकाल ठरवणार ‘कमळी’चा पुढचा प्रवास; निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंची एन्ट्री, मालिकेत मोठा ट्विस्ट

कमळी नापास होऊन गावी परत जाणार? निकालाच्या दिवशी शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्केंची एन्ट्री झाली असून खुद्द शिक्षणमंत्री महाराष्ट्राचा महानिकाल जाहीर करणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: May 29, 2026 | 11:28 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवरील कमळी मालिका नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. लवकरच ही मालिका एक मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेतील नायक नायिका जितके लक्ष वेधून घेतात, तितकेच मालिकेतील खलनायक – खलनायिका देखील लक्ष वेधून घेत असतात. खलनायक काहीतरी मिळवण्यासाठी नेहमी इतरांना त्रास देतात, तर नायक – नायिका नेहमी त्यातून मार्ग काढून, त्रास देणाऱ्यांना धडा शिकवतात.

असेच काहीसे कमळी या मालिकेत पाहायला मिळते. कमळी ही छोट्या गावातून मुंबईत आलेली मुलगी आहे. चांगले शिक्षण घेऊन तिला तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. पण जेव्हापासून ती मुंबईत आली आहे, तेव्ही तिला कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच वार्षिक परीक्षा झाली, ज्यात कमळीला चांगले मार्क मिळू नयेत, म्हणून अनिका, कामिनी, रागिणी हे सगळे मिळून अनेक प्रयत्न करतात. मात्र कमळी येणाऱ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडली. आता झी मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रोमोमध्ये सुरूवातीला ऐकायला मिळते की आव्हानहांना भिडणाऱ्या बेधडक कमळीचा आज निकाल लागणार, कमळी छत्रपती शिवाजी महारांजाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी राहिलेली दिसत आहे. ती म्हणते, “ज्याच्यासाठी गाव सोडून मुंबईत आलो, त्याच्या पहिल्या पायरीचा आज निकाल लागतोय.आशीर्वाद असू द्या.”

The Maharashtra Files : सिनेमाची तारीख ढकलण्यात आली पुढे! दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं “या तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे

प्रोमोमध्ये पुढे दाखवलं जातं की अनिका म्हणते, “कमळी, आता तुझा प्रवास संपणार. एक वर्ष आमच्या डोक्यावर नाचलीस. आता तू नापास होऊन थेट गावाला निघून जाणार.” यानंतर शिक्षणमंत्री विश्वंभंर राजेशिर्के यांची एन्ट्री होते. ते निकाल जाहीर करत म्हणतात, “मुंबई विद्यापीठात पहिल्या आलेल्या त्या विद्यार्थिनीचं नाव आहे….” हे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर निकाल जाणून घेण्याची उत्सुकता आणि तणाव स्पष्टपणे दिसतो.

शाहरूख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, Karan Johar ने अनेक बॉलिवूड स्टार्सना केलं अनफॉलो, नेमकं कारण काय?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने “खुद्द शिक्षणमंत्री जाहीर करणार महाराष्ट्राचा महानिकाल” अशी कॅप्शन दिली असून प्रेक्षकांनी या प्रोमोवर अनेक कमेंंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता येणाऱ्या भागात नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Big twist in kamali annual exam results will decide her future journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
4

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.