Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive Navarashtra-Navadurga: चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

Exclusive Navarashtra-Navadurga: वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गरम पाण्यामुळे झालेल्या भीषण अपघाताने मिताली सोनावणे हिचे आयुष्य बदलले. मात्र, शरीरावरील जखमा स्वीकारत तिने सौंदर्याच्या पारंपरिक संकल्पनांना आव्हान दिले आणि सुपरमॉडेल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 15, 2026 | 09:11 AM
चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

चेहरा जळाला, पण स्वप्नं नाही! शरीरावर भाजल्याचे व्रण असतानाही मिताली बनली सुपरमॉडेल

Follow Us
Follow Us:
  • वयाच्या पाचव्या वर्षी भाजल्याने आयुष्य बदललं, पण जिद्द हरली नाही!
  • बर्न सर्व्हायव्हर ते सुपरमॉडेल
  • मिताली सोनावणेचा थक्क करणारा प्रवास
Exclusive Navarashtra-Navadurga: सौंदर्य म्हणजे नेमकं काय? सुंदर चेहरा, नितळ त्वचा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व एवढ्यापुरतीच सौंदर्याची व्याख्या मर्यादित असते का? मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्याचे काही ठरावीक निकष मानले जातात. मात्र, या पारंपरिक चौकटींना आव्हान देत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुपरमॉडेल मिताली सोनावणेचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी झालेल्या भीषण अपघातामुळे तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. शरीरावर भाजल्याच्या जखमा राहिल्या, पण तिने त्या जखमांना आपली कमजोरी बनू दिले नाही. उलट स्वतःचा स्वीकार करत आत्मविश्वासाच्या जोरावर मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमध्ये मिताली सोनावणेने आपल्या आयुष्यातील संघर्ष, अपघातानंतरचे अनुभव, मॉडेलिंग क्षेत्रातील प्रवास आणि सोशल मीडियावरील सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल मनमोकळा संवाद साधला.

९७ टक्के गुण मिळाले, पण एका अपघाताने बदलले संपूर्ण आयुष्य

मिताली सोनावणेने आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अपघाताचा प्रसंग उलगडला. अवघ्या पाच वर्षांच्या असताना हा अपघात घडला होता. अपघात घडण्यापूर्णी मितालीच्या परीक्षेचा निकाल लागला होता आणि ९७ टक्के गुण मिळाले होते. याचदरम्यान मिताली नातेवाईकांच्या घरी गेली असताना, घरात गरम पाण्याशी संबंधित काम सुरू असताना मिताली जिन्यावरून खाली उतरत होती. खाली उतरत असताना मितालीच्या हातात खेळणी आणि काही वस्तू होत्या. अचानक गरम पाणी पायावर पडले अन् मितालीचा तोल गेला आणि मिताली खाली पडली. या दुर्घटनेत गरम पाणी मितालीच्या शरीरावर सांडले आणि ती गंभीररीत्या भाजली. या घटनेनंतर तिच्या आयुष्यात उपचार, वेदना आणि शारीरिक बदलांचा कठीण प्रवास सुरू झाला.

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव

शरीरावरील जखमा पाहिल्या, पण स्वतःला नाकारले नाही

अपघातानंतरच्या दिवसांबद्दल बोलताना मितालीने सांगितले की, उपचारांच्या काळात तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र, ती लहान असल्याने या जखमा आयुष्यभर आपल्या शरीरावर राहू शकतात, याची सुरुवातीला पूर्ण कल्पना नव्हती. उपचारानंतर तिने स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा तिच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. आपण जिवंत आहोत, घरी परतलो आहोत, ही जाणीव तिच्यासाठी सर्वांत महत्त्वाची होती.या जखमा आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासह आपल्याला पुढे जायचे आहे, असा सकारात्मक दृष्टिकोन मितालीने विकसित केला.

‘आपण स्वतःला स्वीकारलं की जगही आपल्याला स्वीकारतं’

मितालीच्या प्रवासातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःचा स्वीकार. अपघातामुळे शरीरावर उमटलेल्या खुणा लपवण्यापेक्षा तिने त्या त्यांच्यासह आत्मविश्वासाने जगण्याचा मार्ग निवडला. स्वतःच्या शरीराविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि इतरांच्या सौंदर्याच्या निकषांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे, यावर भर दिला. मितालीच्या मते, स्वतःला स्वीकारणे ही आत्मविश्वास निर्माण करण्याची पहिली पायरी आहे. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, यापेक्षा आपण स्वतःकडे कोणत्या नजरेने पाहतो, हे अधिक महत्त्वाचे आहे.

सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्येला दिले आव्हान

मॉडेलिंग क्षेत्रात सौंदर्य, त्वचा, शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्त्व यांसंबंधी अनेक अपेक्षा असतात. मात्र, या अपेक्षांमध्ये स्वतःला बसवण्याऐवजी मितालीने स्वतःचे वेगळेपण स्वीकारले.बर्न सर्व्हायव्हर म्हणून आलेल्या अनुभवांनी तिचा आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला नवी दिशा दिली. सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य रूप नसून आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि स्वतःला स्वीकारण्याची ताकद असल्याचा संदेश आपल्या प्रवासातून दिला. मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करताना तिने शरीरावरील जखमांना आपल्या प्रगतीतील अडथळा मानले नाही.

सोशल मीडियावर १२ हजार फॉलोअर्स, पण खोट्या प्रसिद्धीला नकार

मितालीने पॉडकास्टमध्ये सोशल मीडियावरील अनुभवांबद्दलही भाष्य केले. सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रकार वापरले जात असले, तरी तिने कृत्रिम पद्धतीने फॉलोअर्स वाढवण्याला विरोध दर्शवला. तिच्या म्हणण्यानुसार, सुमारे १२ हजार फॉलोअर्स असून ते खरे आहेत. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी फॉलोअर्स विकत घेण्याची गरज वाटत नाही, असं मितालीने सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंगशी संबंधित शिक्षण घेतल्याचेही सांगितले. तंत्रज्ञानाची माहिती असूनही सोशल मीडियावर कृत्रिम लोकप्रियता निर्माण करण्याऐवजी खऱ्या प्रेक्षकांशी जोडलेले राहण्याला त्या प्राधान्य देतात.

‘हजारो लोकांनी पाहण्यापेक्षा एकाला प्रेरणा मिळाली तरी पुरेसे’

मितालीने आपल्या कामामागील उद्देश स्पष्ट करताना एक महत्त्वाचा विचार मांडला. हजारो लोकांनी आपले काम पाहण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रवासातून प्रेरणा मिळाली, तरी ते अधिक समाधानकारक असल्यासारखं आहे. केवळ लोकप्रियता मिळवणे हा उद्देश नसून स्वतःच्या अनुभवातून इतरांना सकारात्मक संदेश देणे महत्त्वाचे असल्याचे मितालीने स्पष्ट केलं.

नकारात्मक कमेंट्सकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोन

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेकदा ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. मितालीलाही प्रतिक्रिया येतात. मात्र, त्याकडेही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. शंभर सकारात्मक कमेंट्समध्ये एखादी नकारात्मक कमेंट असली, तरी ती लक्ष वेधून घेते. मात्र, अशा प्रतिक्रियांमुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये, असे मत तिने व्यक्त केलं. नकारात्मक कमेंट्स येणे हेदेखील आपले काम अधिक लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे एक लक्षण असू शकते. अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याला महत्व द्या, अशी भावना मितालीने व्यक्त केली.

कुटुंबाचा पाठिंबा ठरला महत्त्वाचा आधार

मितालीच्या प्रवासात कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. आपल्या आईसह जवळच्या व्यक्तींचा उल्लेख केला. आयुष्यातील कठीण प्रसंगांमधून पुढे जाताना कुटुंबाचा आधार आणि स्वतःवरील विश्वास यांचे महत्त्व त्यांच्या संवादातून अधोरेखित झाले.

नवदुर्गा पॉडकास्टमधून आत्मविश्वासाचा संदेश

नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव मानला जातो. याच पार्श्वभूमीवर नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमध्ये मिताली सोनावणेने प्रवास उलगडण्यात आला.वयाच्या पाचव्या वर्षी झालेल्या अपघातानंतर शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शरीरावरील जखमांपेक्षा स्वतःची जिद्द, क्षमता आणि आत्मविश्वास अधिक महत्त्वाचा असल्याचा संदेश त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून मिळतो. मिताली सोनावणेची कहाणी ही केवळ एका बर्न सर्व्हायव्हरची किंवा सुपरमॉडेलची यशोगाथा नाही, तर स्वतःला स्वीकारून समाजाच्या सौंदर्याच्या ठरावीक चौकटींपलीकडे जाण्याची प्रेरणादायी कहाणी आहे.

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Web Title: Burn survivor to supermodel mitali sonawane inspiring journey navdurga podcast navarashtra sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Exclusive
  • Navaratri

संबंधित बातम्या

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम
1

च्युइंग गम मिठाई नाही! गुजरात हायकोर्टाचा मोठा निर्णय, १२.५% व्हॅट आकारणीचा निर्णय कायम

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज
2

Chandrapur News: मोबाईल-इंटरनेटचा अभाव, तरी व्हिडिओ दाखवण्याची सक्ती; चंद्रपुरात मुख्याध्यापकांना नोटिसा बजावल्याने संघटना नाराज

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास
3

Bacchu Kadu: महायुतीतील बंडखोरीने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगली; बच्चू कडूंना अनिल बोंडेंबाबत विश्वास

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज
4

Nalasopara Fire : देव तारी त्याला कोण मारी ! ११व्या मजल्यावर अग्नितांडव, मृत्यूशी केली यशस्वी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.