Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?

Hrita Durgule: मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या आगामी ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये हृता शाळेच्या युनिफॉर्ममध्ये, दोन वेण्या आणि खट्याळ हास्यासह दिसत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 06:35 PM
Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हृता दुर्गुळेचा ‘आली मोठी शहाणी’मधील हटके लुक
  • शाळेच्या युनिफॉर्ममधील पोस्टरने वेधलं लक्ष
  • सारंग साठ्येसोबत हृताची मजेशीर जोडी
मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. ‘दुर्वा’ पासून तिचा प्रवास सुरू झाला आणि ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं‘ या मालिकांनी तिला थेट घराघरात पोहोचवलं. मालिका झाल्या, आता ती सिनेमे, वेब सिरीज, नाटक सगळीकडेच चमकतेय. ‘अनन्या’, ‘कन्नी’, ‘आरपार’ मधली तिची कामं लोकांना खूप आवडली होती.

सध्या ती ‘अगं आई अहो आई’ या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे. झी ५ वर ही सिरीज आली आहे. यात तिच्यासोबत रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत आहेत. या सिरीजला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच हृताने तिच्या पुढच्या सिनेमाची बातमी दिली आहे आणि त्यामुळे चाहते एकदम खुश झाले आहेत.Hrita Durgule:

पोस्टरमध्ये ती शाळेच्या युनिफॉर्ममध्ये

तिच्या नव्या सिनेमाचं नाव आहे ‘आली मोठी शहाणी’.हृताने स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं पहिलं पोस्टर टाकलं आहे. पोस्टर बघूनच खूप धमाल वाटतेय. कारण यात हृता एकदम वेगळ्या रूपात दिसतेय.पोस्टरमध्ये ती शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आहे. पांढरा शर्ट, टाय, दोन घट्ट वेण्या आणि चेहऱ्यावर एक निरागस पण खट्याळ हसू. अगदी शाळेतल्या चुणचुणीत मुलीसारखी दिसतेय ती.

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट

तिच्यासोबत अभिनेता सारंग साठ्ये आहे. त्याच्या कानावर जास्वंदीचं फूल आहे आणि तो हृताचे कान धरताना दिसतोय. हा फोटो इतका गमतीशीर आहे की बघताच हसू येतं. सिनेमा कसला असेल याची उत्सुकता या एका पोस्टरने वाढवली आहे.

२ ऑक्टोबर २०२६ ला सिनेमागृहात

पोस्टर टाकताना हृताने एक छान कॅप्शन लिहिलं आहे. ती म्हणाली, लहान असो किंवा मोठा, आपण सगळेच बाप्पाकडे काहीतरी मागत असतो. आणि बाप्पा पण मोठ्या मनाने आपल्याला देतो. हा सिनेमा पण तसाच आहे, आपल्याच घरातली, हलकीफुलकी आणि गोड गोष्ट आहे असं तिने सांगितलं.आता सगळ्यांना प्रश्न पडलाय हा सिनेमा कधी येणार?तर ‘आली मोठी शहाणी’ हा सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ ला सिनेमागृहात येणार आहे.

हृताच्या या नव्या लूकने तर सगळ्यांची मनं जिंकली

या सिनेमाचं दिग्दर्शन आनंद गोखले यांनी केलं आहे.या सिनेमात फक्त हृता आणि सारंगच नाहीत तर अजून बरेच ओळखीचे चेहरे आहेत. ऋजुता देशमुख, मैत्रयी दाते, सुहिता थत्ते, गुरू ठाकूर, विशाखा नाईक, प्रशांत कुलकर्णी असे बरेच चांगले कलाकार यात दिसणार आहेत.एकंदरीत, शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा आणि पोट धरून हसवणारा असा हा सिनेमा असेल असं वाटतंय. हृताच्या या नव्या लूकने तर सगळ्यांची मनं जिंकली आहेतच.

Web Title: Hruta durgules new look in aali mothi shahani grabs attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Germany News : फ्रँकफर्टमध्ये हिंसाचाराचा भडका; १७ दुकानांची तोडफोड, ५ दुकानांची लूट
1

Germany News : फ्रँकफर्टमध्ये हिंसाचाराचा भडका; १७ दुकानांची तोडफोड, ५ दुकानांची लूट

Israel News : इस्रायलमध्ये अमेरिकेच्या टँकर विमानांची मोठी जमवाजमव; इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेला वेग
2

Israel News : इस्रायलमध्ये अमेरिकेच्या टँकर विमानांची मोठी जमवाजमव; इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईच्या चर्चेला वेग

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत
3

Satara News : भोसले की गाढवे, खंडाळ्यात कोण मारणार बाजी? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून
4

Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.