
फोटो सौजन्य सोशल मीडिया
इस्रायलमधील चॅनेल १४ या वृत्तवाहिनीने ३० ऑक्टोबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेची सुमारे ८० इंधन भरणारी टँकर विमाने इस्रायलमध्ये दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे . यासोबत किमान १० अमेरिकन लष्करी मालवाहू विमानेही दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे . मात्र ८० टँकर विमानांच्या संख्येला अमेरिका किंवा इस्रायलकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही . त्यामुळे या आकड्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही .
Italy News : बालविवाहाचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानी इमामला इटलीतून दिले हाकलून
अमेरिकेच्या या हवाई हालचालींचा संबंध इराणसोबत वाढलेल्या तणावाशी जोडला जात आहे. कारण ट्रम्प यांचे राजकारण आणि जगभरातील इतर राजकीय विश्लेषक यांनी दिलेले संकेत तसेच इराणकडून सुद्धा कोणत्याही हल्ल्यासाठी तत्पर असल्याचे संकेत आहेत . त्यामुळे इराणसोबतच्या युद्धात हवाई युद्धाचे प्रमाण जास्तच असल्याने . इंधन भरणारी विमाने लढाऊ विमानांना हवेतच इंधन पुरवतात.
त्यामुळे त्यांना वारंवार जमिनीवर उतरवण्याची गरज राहत नाही आणि लांब पल्ल्याच्या लष्करी मोहिमा राबवणे शक्य होते.KC-135 Stratotanker आणि KC-46 Pegasus यांसारखी विमाने अमेरिकेच्या हवाई मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. इराणविरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर अशा विमानांची तैनाती महत्त्वाची मानली जात आहे .
इस्रायलमधील लष्करी तळांवर अमेरिकन विमानांची वाढती उपस्थिती ही केवळ संरक्षणात्मक तयारी आहे की संभाव्य हल्ल्यांसाठीची पूर्वतयारी, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कारण कधीही काहीही निर्णय घेतला जाऊ शकतो . एवढे हे युद्ध संवेदनशील होऊन बसले आहे .
याआधीही जुलै २०२६ मध्ये अमेरिकेने इस्रायलमध्ये अतिरिक्त टँकर विमाने तैनात करण्याचा निर्णय घेतला होता.याच दरम्यान, अमेरिकेच्या या हालचालींमुळे इराणकडून काय प्रतिसाद मिळतो , याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. मात्र, टँकर विमानांच्या कथित नव्या तैनातीवरून थेट युद्ध सुरू होणार असल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल