Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth: मार्तंडचा डाव यशस्वी होणार की उलटणार? स्वामींविरोधात सुभेदारांचा मोठा निर्णय; ४ दिवसांची मुदत

Jay Jay Swami Samarth: शिवनाथ-राधाच्या बाळाभोवती गूढ वाढलं आहे. सुभेदारांनी स्वामींना ४ दिवसांची मुदत दिली असून नागपंचमीला मोठी ‘प्रचिती’ पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 12:51 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. अक्कलकोटच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिवनाथ आणि राधाच्या बाळाभोवतीचं गूढ दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. स्वामींना हे बाळ त्याच्या आई-वडिलांपासून दूर का करायचं आहे? बाळावर स्वामी स्वतःचा अधिक अधिकार का सांगत आहेत? या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात आहेत.

दरम्यान, चावडीवर सुभेदारांनी स्वामींना स्पष्ट ताकीद दिली आहे. “चार दिवसांत हा अध्याय संपवा, अन्यथा तुमच्या कृत्याबद्दल तुम्हाला शिक्षा करावी लागेल,” असा इशारा सुभेदारांनी स्वामींना दिला आहे. मात्र, स्वामी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं गूढ स्मित पाहून त्यांच्या मनात नेमकं काय आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

नागपंचमीला घडणार मोठी ‘प्रचिती’?

दरम्यान, नागपंचमीच्या निमित्ताने मालिकेच्या कथानकाला आणखी एक दिव्य आणि अनपेक्षित वळण मिळणार आहे. स्वामींच्या भविष्यवाणीनुसार शिवनाथ आणि राधाला नागपंचमीच्या दिवशी एका मोठ्या ‘प्रचिती’चा अनुभव येणार आहे. स्वामींच्या स्थानावर घडणाऱ्या अद्भुत घटनांमुळे भक्त भारावून जाणार आहेत.

एका बाजूला श्रद्धा, भक्ती आणि स्वामींचे दिव्य संकेत पाहायला मिळणार असताना दुसरीकडे सदाशिव आणि रेणुकाच्या आयुष्यातील संकटही अधिक गडद होत आहे. त्यामुळे आगामी भागात अनेक धक्कादायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Hema Malini: ‘बटवारा 1947’ पाहून हेमा मालिनी झाल्या भावुक! सावत्र मुलाच्या चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाल्या…

‘बाळाच्या आयुष्यातले काटे आम्ही बाजूला करणारच’!

स्वामींच्या “बाळाच्या आयुष्यातले काटे आम्ही बाजूला करणारच” या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज शिवनाथ आणि राधाला स्वामी आपल्या बाळासाठी धोका असल्याचं वाटत आहे. मात्र, स्वामींच्या कृतीमागचं खरं कारण त्यांना कधी समजणार? स्वामी बाळाला आपल्यापासून दूर का ठेवू पाहत आहेत, याचं गूढ लवकरच उलगडणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

मार्तंडचा डाव यशस्वी होणार?

या सर्व घडामोडींमागे मार्तंडचा डावही महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामींचं युग संपवण्याच्या आपल्या छुप्या अजेंड्यासाठी मार्तंडने शिवनाथच्या आरोपांना धार दिली आहे. त्याने सुभेदारांचं लक्ष स्वामींविरोधातील प्रकरणाकडे वळवलं असून, आता सुभेदारांनी स्वतः स्वामींना चार दिवसांची मुदत दिली आहे.

त्यामुळे मार्तंडच्या डावाला पहिल्यांदाच मोठं यश मिळालं आहे. मात्र, स्वामींच्या सामर्थ्यापुढे मार्तंडचा हा डाव कितपत यशस्वी होणार, हा प्रश्न आहे. स्वामींचं युग संपवण्याचं मार्तंडचं स्वप्न पूर्ण होणार की त्याचाच डाव त्याच्यावर उलटणार, हे आगामी भागांत स्पष्ट होईल.

आता स्वामी बाळासाठीचा आपला हट्ट सोडणार का? शिवनाथ-राधाला स्वामींच्या असामान्य मागणीमागचं सत्य समजणार का? की अक्कलकोटला हादरवणारा निर्णय घेत स्वामींनाच शिक्षेला सामोरं जावं लागणार? नागपंचमीपासून सुरू होणाऱ्या या निर्णायक पर्वात या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

Pulkit Samrat Health: २.५ किलो वजन घटलं, मलेरियाशी लढतोय पुलकित सम्राट; इन्स्टाग्रामवर शेअर केला भावुक अनुभव

Web Title: Jay jay swami samarth big twist swami 4 days deadline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
1

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
3

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
4

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.