Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhaktya Sunbai Marathi Serial: अंबाबाईचं दर्शन, मनात श्रद्धा अन् हातात काम! मंदार जाधवांनी कोल्हापुरात केला शूटिंगचा श्रीगणेशा

Dhaktya Sunbai Marathi Serial: अभिनेता मंदार जाधव ‘झी मराठी’च्या ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत वेदांत पटवर्धन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. वेदांत हा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कुटुंबावर प्रेम करणारा तरुण असून अन्यायाविरोधात ठामपणे उभा राहणारी त्याची व्यक्तिरेखा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 11:49 AM
Dhaktya Sunbai Marathi Serial: (फोटो- सोशलमीडिया)

Dhaktya Sunbai Marathi Serial: (फोटो- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Mandar Jadhav on Dhaktya Sunbai: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारा प्रतिभावान अभिनेता मंदार जाधव आता झी मराठीच्या ‘ धाकट्या सुनबाई’ या मालिकेत तो वेदांत पटवर्धन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. वेदांत हा आजच्या पिढीचा सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मंदार पहिल्यांदाच झी मराठीसोबत काम करत असून, या नव्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल त्याच्याशी साधलेला हा संवाद.‘धाकट्या सुनबाई’ मध्ये मी वेदांत पटवर्धन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. Dhaktya Sunbai Marathi Serial:

झी मराठीसोबत काम करण्याची इच्छा

वेदांत हा आजच्या पिढीचा मुलगा आहे. तो सुशिक्षित, सुसंस्कृत आहे. आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा, प्रत्येकाला सांभाळून घेणारा आणि सर्वांचा आदर करणारा असा हा मुलगा आहे. वेदांतच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे तो अन्याय किंवा अत्याचार कधीच सहन करत नाही. त्याच्या समोर कोणावर अन्याय होत असेल, तर तो त्याविरोधात ठामपणे उभा राहतो. अगदी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जावं लागलं तरी योग्य गोष्टीसाठी तो मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये असावा असा आणि प्रत्येक मुलीला आपला जोडीदार असा असावा वाटेल, अशी ही व्यक्तिरेखा आहे.

Exclusive: अभिनेता म्हणून आव्हानं आवडतात, ‘धाकट्या सूनबाई’ मालिकेतून मंदार जाधव पहिल्यांदाच झी मराठीवर

मला झी मराठीसोबत काम करण्याची इच्छा होती; मात्र काही कारणांमुळे ते योग्य प्रकारे जुळून येत नव्हतं. ‘धाकट्या सुनबाई’ ही मालिका कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. याआधीही मी कोठारे व्हिजनसोबत काम केलं आहे. त्यामुळे जेव्हा मला या मालिकेसाठी कॉल आला, तेव्हा मी लगेच होकार दिला.

एक म्हणजे झी मराठीसोबत काम करण्याची संधी मिळत होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा महेश कोठारे सरांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे हा कॉल माझ्यासाठी खूप खास होता आणि माझा आनंद खरंच दुप्पट झाला होता.माझा नेहमीच प्रयत्न असतो की माझी प्रत्येक नवीन भूमिका माझ्या आधीच्या पात्रांपेक्षा वेगळी दिसावी. त्या व्यक्तिरेखेचा लूक वेगळा असावा, तिची देहबोली वेगळी असावी आणि प्रेक्षकांना माझ्यातील एक नवीन बाजू पाहायला मिळावी, यासाठी मी प्रयत्न करत असतो.

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

वेदांतच्या भूमिकेसाठी मी स्वतःला फिजिकली ट्रान्सफॉर्म केलं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. रोज जिमला जाणं, खाण्यापिण्याचं पथ्य पाळणं आणि स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देणं, हे सगळं मी करत आहे. त्याचा परिणाम तुम्ही प्रोमोमध्ये पाहिला असेलच आणि मालिकेतही तो नक्कीच जाणवेल. मला प्रेक्षकांकडूनही या लूकला आणि प्रोमोला छान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझी मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय याचा खूप आनंद आहे. मला स्वतःला नेहमीच नवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात आणि वेदांतच्या भूमिकेच्या निमित्ताने मी स्वतःलाच पुन्हा एकदा आव्हान देत आहे.

कलाकार खूप सपोर्टिव्ह

मालिका हा एक मोठा प्रवास असतो. या प्रवासात चांगले सहकलाकार आणि उत्तम टीम सोबत असेल, तर हा प्रवास आणखी सुंदर आणि सुखकर होतो. ‘धाकट्या सुनबाई’च्या निमित्ताने मला खूप उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे.सगळेच कलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत.

आमच्यामध्ये सुरुवातीपासूनच छान केमिस्ट्री जुळून आली आहे आणि ती तुम्हाला मालिकेतही पाहायला मिळेल. आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर अतिशय छान पद्धतीने आमच्याकडून काम करून घेत आहेत. विशेषतः राधिका आणि वेदांतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आम्हाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांचं प्रेम खूप प्रोत्साहन देणारं आहे. त्यामुळे ही केमिस्ट्री आणि हा प्रवास प्रेक्षकांनाही आवडतोय याचा आनंद आहे.

पहिल्याच दिवशी मी अंबाबाईचं दर्शन

शूटिंगच्या निमित्ताने आमचं खूप फिरणं होत असतं. ‘धाकटी सुनबाई’च्या शूटिंगसाठी आम्ही कोल्हापूर ला गेलो होतो. मालिकेचे सुरुवातीचे काही भाग आम्ही कोल्हापूरमध्ये शूट केले आहेत. पहिल्याच दिवशी मी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि तिचे आशीर्वाद घेऊन शूटिंगला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूरमधील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शूट केलं.

पंचगंगा नदीच्या गंगा घाटावरही आम्ही बरेच सीन शूट केले आहेत, जे प्रेक्षकांना मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांमध्ये पाहायला मिळतील. वेदांत आणि राधिकाची पहिली भेटही याच नदीच्या काठावर होते. तिथे शूटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक लोकांना समजली आणि आम्हाला भेटण्यासाठी तिथे प्रचंड गर्दी झाली होती. त्यांना भेटून आम्हालाही खूप छान वाटलं. प्रेक्षक आपल्याला नेहमी टीव्हीवर पाहतात; पण अशा निमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटता येते, संवाद साधता येतो, हे खूप खास असतं. आमच्यासाठी तो एक कमाल अनुभव होता. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे.

नवनवीन भूमिका करण्याची प्रेरणा

माझ्या आयुष्यातील पहिल्या मालिकेची सुरुवात झी टीव्हीच्या ‘अल्लादिन’ या मालिकेपासून झाली होती, ज्यामध्ये मी अल्लादिनची भूमिका साकारली होती. आणि आता पुन्हा एकदा झी कुटुंबाशी जोडला गेलो आहे. मला माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत.

माझ्या आजवरच्या कामाला प्रेक्षकांनी नेहमीच छान प्रतिसाद दिला आहे आणि त्यांच्या या प्रेमामुळेच मला नवनवीन भूमिका करण्याची प्रेरणा मिळते. यापुढेही माझ्या कामावर आणि माझ्यावर अशीच साथ, प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू दे, हीच इच्छा आहे. ‘धाकट्या सुनबाई’ या नव्या मालिकेलाही तुमचं तितकंच प्रेम आणि आशीर्वाद मिळावा. तेव्हा पाहायला विसरू नका ‘धाकट्या सुनबाई’, संध्या. ६:३० वा., फक्त आपल्या झी मराठीवर.

Web Title: Mandar jadhav dhaktya sunbai vedant patwardhan kolhapur shoot rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
1

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
4

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.