Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive Friendship Day: मालिकेसारखेच आमचे बाँडिंग, शारदा-गौरी-सौदामिनी ‘कृष्णाईच्या लेकी’ खऱ्या आयुष्यातही बहिणीप्रमाणेच

Exclusive Friendship Day: २ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आणि सिस्टर्स डे साजरा करण्यात येत आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ मधील तिन्ही बहिणींचा बाँड कसा आहे यावर खास बातचीत नवराष्ट्रशी केली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 01, 2026 | 04:28 PM
Exclusive: शारदा - गौरी आणि सौदामिनीचा खऱ्या आयुष्यातील बाँड कसा आहे

Exclusive: शारदा - गौरी आणि सौदामिनीचा खऱ्या आयुष्यातील बाँड कसा आहे

Follow Us
Follow Us:

Exclusive Friendship Day: ऑगस्टमधील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण २ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आणि सिस्टर्स डे असा योग जुळून आला आहे आणि याच निमित्ताने झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेतील ३ बहिणींची भूमिका साकारणाऱ्या एकता, ट्विंकल आणि नारायणी यांचा बाँड कसा आहे हे जाणून घेण्याची संधी ‘नवराष्ट्र’ला मिळाली. यापैकी शारदा आणि सौदामिनीची भूमिका साकारणाऱ्या एकता आणि सौदामिनीशी आम्ही गप्पा मारल्या. 

एकता आणि नारायणीला जेव्हा आम्ही विचारलं की, कृष्णाईच्या लेकी मालिकेतील तुमचा बहिणीचा बाँड दिसून येतोय पण खऱ्या आयुष्यातील तुमचा बाँड कसा आहे? यावर दोघीही म्हणाल्या की, ‘तिघींचा बाँड जसा मालिकेत दाखवला आहे अगदी तसाच आहे.’ नारायणीने यावर पुढे सांगितलं की, ‘डबा शेअरिंगपासून ते अगदी सिक्रेट शेअरिंगपर्यंत अशाच आम्ही एकत्र असतो आणि मज्जा करतो’, तर शारदाच्या भूमिकेतील एकताने सांगितलं की, ‘तिघींचाही बाँड पहिल्या दिवसापासूनच खूप छान झाला. एकमेकींना चिडवणं असो वा तब्बेतीची काळजी घेणं असो आम्ही नेहमी एकत्र असतो. मजामस्ती कायम असते आणि तिघी एकत्र असलो की, सेटवर पण धमाल करतो.’

शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने सर्वात जास्त मस्तीखोर तिघींमध्ये कोण आहे म्हटल्यावर दोघींनीही ‘गौरी अर्थात ट्विंकल यादव’ हेच नाव घेतलं. ट्विंकलची ही पहिली मालिका आहे आणि तिच्यासाठी हे सर्व काही नवं आहे असंही आवर्जून यावेळी एकताने सांगितलं. तर शूटिंगदरम्यान काही अडचण आली तर तिघीही एकमेकींंना विचारतो. नारायणीने सांगितलं की, ‘मला असं काही जाणवलं तर मी नक्कीच ट्विंकलशी बोलेन’ आणि एकता म्हणाली की, ‘ट्विंकलशी आणि नारायणीशी दोघींशीही चांगला बाँड आहे. पण ट्विंकल त्यामानाने नवीन आहे तर तिच्याशी पटकन कनेक्ट होता येतं. कारण तिला जास्त प्रश्न असतात.’

तुमच्यातील बाँडिंग कसं तयार झालं, आधीपासून ओळखत होतात का? असं विचारल्यावर नारायणी आणि एकता दोघीही म्हणाल्या की, ‘एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात आमची भेट झाली होती पण ट्विंकलशी ओळख ही मात्र लुक टेस्टच्या वेळी झाली. पण बाँड तयार व्हायला वेळ लागला नाही.’

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने एकमेकींना काय खास मेसेज द्याल असं विचारल्यावर नारायणी म्हणाली की, ‘हा बाँड मालिका जसजशी पुढे जाईल तसतसा वाढत जावो आणि मालिका संपल्यानंतरही असाच राहो हीच इच्छा आहे.’ तर एकता म्हणाली की, ‘ट्विंकल आणि नारायणी दोघीही अत्यंत गुणी आणि गोड आहेत. रोज नवनवीन इथे शिकावं लागतं आणि खचून न जाता जबाबदारीने आव्हानं पेलावी. नारायणी तर वयापेक्षा खूपच समजूतदार आहे आणि दोघींना पण खूप शुभेच्छा. यानिमित्ताने एकच सांगेन की, संगतीने खूपच फरक पडतो. त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत मैत्री निवडा हे मी आवर्जून सांगेन’ सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. तिघींचा बाँड हे नक्कीच त्यामागील एक कारण आहे!

Zee Marathi New Serial: संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा भव्य शुभारंभ; कलाकारांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

Web Title: Krushaichya leki serial bonding of sharada gauri and saudamini just like sisters and friends exclusive friendship day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
1

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
2

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
3

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
4

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.