Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Marathi Serial: आईच्या संघर्षातून उभी राहणारी स्त्रीशक्तीची कहाणी; ‘कृष्णाईच्या लेकी’ झी मराठीवर लवकरच

‘कृष्णाईच्या लेकी’ ही झी मराठीवरील नवी मालिका स्त्रीशक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बदलांची प्रेरणादायी कथा सांगते. निवेदिता सराफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 01, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

समाजात आजही दिसणाऱ्या जुन्या रूढी, परंपरा आणि स्त्रियांबाबतच्या भेदभावपूर्ण विचारसरणीवर अनेक कथा प्रेक्षकांना विचार करायला लावतात. अशाच पार्श्वभूमीवर झी मराठी  एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे, ती एका आई आणि तिच्या मुलींच्या संघर्षाची कहाणी सांगणार आहे.समाजाने ठरवलेल्या चौकटी मोडून स्वतःचा वेगळा मार्ग निवडणारी ही आई आणि तिच्या मुली यांची गोष्ट प्रेरणादायी आहे. मुलगा-मुलगी भेद, स्त्रीचा स्वाभिमान, शिक्षणाचं महत्त्व आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष हे विषय या मालिकेत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मांडले जाणार आहेत.

ही कथा कृष्णाईची आहे, जी आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना सामोरी जात आपल्या तीन मुलींना चांगले संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देते. मुलीच जन्माला आल्यामुळे पतीने दुसरे लग्न केले आणि समाज तसेच कुटुंबाकडूनही तिला सतत कमी लेखले गेले. तरीही कृष्णाई कधीच खचत नाही.

“मुलगा नसला तरी स्त्रीचे मूल्य कमी होत नाही” आणि “मुलीही मुलांइतक्याच सक्षम असतात” हा विश्वास ती आपल्या कृतीतून सिद्ध करते.

या कथेत कृष्णाईच्या तीन मुलींचा प्रवास मध्यवर्ती आहे. मोठी मुलगी शारदा शांत आणि समजूतदार असून आईसारखी जबाबदार आहे. मधली गौरी बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तिच्यात आहे. तर धाकटी सौदामिनी स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअरकेंद्रित आहे.प्रत्येक मुलीला समाजातील रूढी, परंपरा आणि अन्यायाचा सामना करावा लागतो. पण कृष्णाई त्यांना प्रत्येक टप्प्यावर आधार देते आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित करते.

मुलींच्या शिक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेली धडपड ही कथानकाची महत्त्वाची बाजू आहे. कौटुंबिक दबाव, समाजाचे नियम, मुलींचे लग्न, करिअर आणि त्यांच्या आयुष्यात येणारी आव्हाने यांमधून अनेक भावनिक व नाट्यमय घडामोडी उलगडतात.

‘कृष्णाईच्या लेकी’ ही केवळ कौटुंबिक नाट्य मालिका नसून स्त्रीशक्ती, स्वाभिमान, नात्यांतील भावनिक गुंतागुंत आणि सामाजिक बदल यांचा प्रभावी संदेश देणारी कथा आहे. “मुलगी ही ओझं नसून घराचा आधार असते” हा ठाम विचार कृष्णाई आपल्या आयुष्यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

स्वतःच्या पायावर उभे राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वाभिमान जपणे या मूल्यांचा वारसा ती आपल्या मुलींना देते. आई आणि मुलींचा हा संघर्षमय पण प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडणारा आहे.

Hemant Dhome Post: गौराई आली घरी! हेमंत ढोमेने फोटो पोस्ट करत दिली आनंदाची बातमी,चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मालिकेतील कलाकार
या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या कृष्णाईची भूमिका साकारत असून त्या पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहेत. त्यांच्या सशक्त अभिनयातून एका खंबीर आईचा भावनिक आणि संघर्षमय प्रवास उलगडणार आहे.त्यांच्यासोबत मालिकेत ट्वीकल यादव, रोहित परशुराम, स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी, साक्षी गांधी आणि एकता लब्दे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सामाजिक विषयांना स्पर्श करणारी ही कथा लेखक तेजेश घाटगे यांनी लिहिली असून मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने करणार आहेत.

“राहील तुझी आई म्हणून…” धाकट्या लेकाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त जिनिलीया देशमुखची हृदयस्पर्शी पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला,…

ओशन फिल्म्स निर्मित ही मालिका वास्तवाशी जवळीक साधणारी आणि संवेदनशील विषयांची प्रभावी मांडणी करणारी असून ‘कृष्णाईच्या लेकी’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल.

Web Title: New marathi serial a story of woman power rising from a mothers struggle krushnaichya leki coming soon on zee marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.