Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” शिक्षक दिनानिमित्त अभिनेत्याचं मन जिंकणारं वक्तव्य

Sangram Samel:शिक्षक दिनानिमित्त अभिनेता संग्राम समेळ यांनी आपल्या आयुष्यातील गुरुंच्या आठवणी सांगत कृतज्ञता व्यक्त केली. ‘सन मराठी’वरील ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील अभिमन्यूची भूमिका साकारणाऱ्या संग्रामने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कलाक्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 04, 2026 | 04:37 PM
Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sangram Samel: “आयुष्यातील पहिले गुरु आई-बाबाच!” (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आई-बाबा हेच माझे पहिले गुरु, असे संग्राम समेळ म्हणाला.
  •  बाबांकडून लढण्याची जिद्द, तर आईकडून प्रेम आणि माणसं जपण्याची शिकवण मिळाली.
  • प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकता येतं, असा संग्रामचा अनुभव.
 

Sangram Samel on Teachers’ Day: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक गुरु असतो, जो केवळ शिकवत नाही तर नकळत आपल्याला घडवतही असतो. ‘सन मराठी’वरील ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता संग्राम समेळने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. लहान वयापासून अभिनय करताना त्याला आयुष्यात भेटलेल्या अनेक व्यक्तींकडून काही ना काही शिकायला मिळालं. याच गुरुंची आठवण सांगत शिक्षक दिनानिमित्त संग्रामने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. Sangram Samel:

“प्रत्येक परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे शिकवलं.”

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना संग्राम म्हणाला, “अभिनयाचं बाळकडू मला आई-बाबांकडूनच मिळालं, त्यामुळे कलाक्षेत्रातील माझे पहिले गुरु तेच आहेत. लहानपणापासून अभ्यास सांभाळत मी अभिनय केला आहे. जसजसा मोठा होत गेलो, तसतसं बाबांनी या क्षेत्रात कसं टिकून राहायचं आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे शिकवलं.

आईकडून प्रेम करायला आणि माणसं जपायला शिकलो, तर बाबांकडून लढण्याची जिद्द मिळाली. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते. सेटवरील स्पॉटबॉयपासून ते आपल्या सहकलाकारांपर्यंत, प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं. शरीरात कितीही थकवा असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवून काम करणं मी त्यांच्याकडून शिकलो. माझ्या बायकोने मला संयम ठेवायला आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्यायला शिकवलं.”

कलाक्षेत्रात आईसारखी माया करणारी व्यक्ती

कलाक्षेत्रात संग्रामला आईसारखी माया देणारी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकर. ‘मुलगी पसंत आहे’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं असून त्यांचं नातं त्याही आधीपासूनच जिव्हाळ्याचं आहे. तिच्याबद्दल बोलताना संग्राम म्हणाला की, “हर्षदा ताई तिच्या सगळ्या लेकरांवर खूप प्रेम करते. तिच्या बद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर, आपण एखाद्याला सहज म्हणतो की घरी पोहोचल्यानंतर फोन कर, पण आपण स्वतः कधी कधी ते विसरतो. मात्र हर्षदा ताई स्वतः फोन करून ‘पोहोचलास का?’ हे आवर्जून विचारते. अगदी नाईट शूट असेल आणि ती माझ्यासोबत नसेल, तरी पहाटे चार साडेचार वाजता फोन करून माझी चौकशी करते.

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

तिच्याकडून प्रत्येक व्यक्तीवर भरभरून प्रेम करायला शिकलो. कुणीतरी आपल्यावर प्रेम करतं यापेक्षा आपण कुणावर प्रेम करतो आणि त्यातून आपल्याला समाधान मिळतं, ही गोष्ट मी तिच्याकडून शिकलो. शिक्षक दिनानिमित्त तिच्यासोबत वेळ घालवायची संधी मिळाली, तर तिला परदेशात फिरायला घेऊन जाणं मला नक्कीच आवडेल.”

सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेत रंजक वळण

सध्या ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेत रंजक वळण आलं आहे. वृंदा मोहनच्या शोधात असून तिचा हा शोध तिला कुठे घेऊन जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अभिमन्यूच मोहन आहे का, हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत आहे. वृंदा मोहन आपल्या शोधात यशस्वी होणार का आणि या शोधातून कोणतं सत्य समोर येणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ही मालिका दररोज रात्री ९:४५ वाजता सन मराठी वाहिनीवर प्रसारित होते.

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Web Title: Parents are the first teachers in life actor sangram samel heartwarming statement on teachers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
1

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
2

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
3

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
4

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.