Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sachin Deshpande: इन्स्टावर कमी फॉलोवर्समुळे नाही तर… अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, सांगितलं इंडस्ट्रीचं भयावह वास्तव

Sachin Deshpande होणार सून मी ह्या घरची' फेम अभिनेता सचिन देशपांडेने इन्स्टाग्रामवर कमी फॉलोवर्समुळे मालिकेतून रिप्लेस केल्याचा दावा केला. कास्टिंग प्रक्रिया आणि मराठी टीव्ही इंडस्ट्रीबाबत त्याने मोठा खुलासा केला.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 03, 2026 | 08:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sachin Deshpande: मराठी मनोरंजनसृष्टीत सोशल मीडियावरील लोकप्रियतेला वाढत चाललेलं महत्त्व पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सचिन देशपांडे(Sachin Deshpande) याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला की इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स कमी असलेल्या त्याला हातातील काम सोडावं लागलं होते.

अभिनेता सचिन देशपांडे यांने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कमी फॉलोवर्समुळे मालिकेतून रिप्लेस केल्याचं सांगितले आहे. तो म्हणाला,” आजकाल ऑडिशन्सची पद्दर फार बदलली आहे. आधी एखाद्या मालिकेसाठी कलाकरांचे नाव सुचवण्याचं काम दिग्दर्शक करायचा. पण त्यावेशी दिग्दर्शक हाच कॅप्टन ऑफ द शीप असायचा.तो म्हणाला, “सिनेमामध्ये दिग्दर्शकाचं जितकं महत्त्व असतं, तितकंच महत्त्व पूर्वी मालिकांमध्येही दिग्दर्शकाला दिलं जायचं. मात्र आता तसं राहिलेलं नाही. कास्टिंगची संपूर्ण प्रक्रिया वाहिन्यांच्या हातात गेली आहे.”

Huma Qureshi: ‘टॉक्सिक’ वादावर हुमा कुरेशीने सोडले मौन; कियारा अडवाणीच्या समर्थनात येत म्हणाली, ‘हे खूपच किळसवाणे…’

‘दिग्दर्शकांऐवजी चॅनेल ठरवतं कास्टिंग’

पुढे तो म्हणाला, “चॅनलवर बसलेले लोकच कलाकारांची निवड करतात. पूर्वी आम्ही थेट दिग्दर्शकांना फोन करू शकत होतो किंवा प्रत्यक्ष भेटू शकत होतो. पण आता ज्यांच्या हातात काम देण्याचा निर्णय असतो, त्या लोकांपर्यंत कलाकार म्हणून पोहोचणंही शक्य होत नाही.”

सचिन देशपांडेने एका प्रसंगाचा उल्लेख करत इंडस्ट्रीतील वास्तव उघड केलं. तो म्हणाला, “मला नंबर वन चॅनेलवरील एका मालिकेत कॅमिओ भूमिकेसाठी विचारणा झाली होती. मी होकारही दिला होता आणि मानधनाबाबतही चर्चा झाली होती. काही वेळाने प्रोडक्शनमधील व्यक्तीने मला मेसेज करून माझा इन्स्टाग्राम आयडी मागितला. मी त्यामागचं कारण विचारलं असता, ‘तुझे फॉलोवर्स बघायचे आहेत,’ असं उत्तर मिळालं.”

Pranit More Biryani Controversy : बिर्याणी वादानंतर भावुक झाला प्रणित मोरे; पहिल्याच लाइव्ह शोमध्ये अश्रू अनावर

कमी इन्स्टाग्राम फॉलोवर्समुळे गमावली भूमिका

पुढे तो म्हणाला, “मी लगेच माझा इन्स्टाग्राम आयडी पाठवला. मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद आला नाही. दोन दिवसांनी कळलं की माझ्या जागी दुसऱ्याच एका अभिनेत्याला त्या भूमिकेसाठी घेतलं आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर माझ्यापेक्षा जास्त फॉलोवर्स होते.”

या अनुभवावर भाष्य करत सचिनने इंडस्ट्रीतील बदलत्या निकषांवर नाराजी व्यक्त केली. “आजकाल इंडस्ट्रीमध्ये कलाकाराचं कास्टिंग त्याच्या अभिनयावर नव्हे, तर सोशल मीडियावरील फॉलोवर्सच्या संख्येवर ठरतं. हीच आता नवी पद्धत झाली आहे,” असं म्हणत त्याने मनोरंजनविश्वातील कटू वास्तव समोर आणलं.

आता याबाबत सचिनने अजून एक पोस्ट करत यु-टर्न घेतला आहे. तो म्हणाला की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून त्यावर त्याने आपली बाजू आपण क्लिअर करत असल्याची स्टोरी इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत हेडलाईन चुकीच्या करण्यात आल्याचा दावा केला आहे आणि सर्वांना हेडलाईन बदलण्याची विनंतही केली आहे. वाचा पोस्ट

सचिन देशपांडेची पोस्ट (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

Web Title: Sachin deshpande instagram followers replaced from serial shocking revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi actor
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
1

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
2

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज
3

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव
4

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.