Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial: आषाढी वारीचा भक्तिरंग झी मराठीवर! ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’मध्ये रंगणार खास वारी विशेष भाग

Ashadhi Wari Special: आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीवरील 'सनई चौघडे' आणि 'कमळी' मालिकांमध्ये खास वारी विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. कलाकारांनी चित्रीकरणाचे भक्तिमय अनुभवही शेअर केले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 03:19 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ashadhi Wari Special: झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांना या वर्षी आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’ या मालिकांमध्ये आषाढी वारी विशेष भाग सादर करण्यात येणार असून, भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा सुंदर संगम या भागांत पाहायला मिळणार आहे.

‘सनई चौघडे’ मालिकेत परब कुटुंब डबेवाल्यांना घरी भोजनासाठी निमंत्रित करत आषाढी वारीचा सोहळा साजरा करणार आहे. पमा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून डबेवाल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. भजन-कीर्तनाच्या गजरात संपूर्ण घर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेलं दिसणार आहे.

पमाची भूमिका साकारणाऱ्या मेघना एरंडे जोशी यांनी सांगितले की, त्यांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव नसला तरी या भागाच्या चित्रीकरणादरम्यान पांडुरंगाची सेवा केल्याचा भास झाला. सेटवर वारकरी वेशातील एका लहान मुलाची सेवा करताना मनाला मिळालेलं समाधान त्यांनी शब्दांत व्यक्त केलं.

याच भागात जयची भूमिकाही महत्त्वाचं वळण घेणार आहे. पहिल्यांदाच जय शेकडो वारकऱ्यांसाठी मोठ्या भांड्यात खिचडी बनवताना दिसणार आहे. याबाबत अभिनेता राज हंचनाळे म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करणं किती जबाबदारीचं आणि कष्टाचं काम असतं, याची जाणीव या प्रसंगामुळे झाली.

दुसरीकडे ‘कमळी’ मालिकेतही आषाढी विशेष भागातून कथानकाला नवं वळण मिळणार आहे. सरोजच्या आगमनामुळे महाजन कुटुंबातील अनेक प्रश्न निर्माण होणार असून, कमळीच्या आयुष्याशी संबंधित महत्त्वाचा धागाही तिच्या हाती लागणार आहे.

Jana Nayagan Review: विजयच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव; दिग्दर्शनावर टीका, बॉबी देओलच्या भूमिकेवरही नाराजी

कमळीची भूमिका साकारणाऱ्या विजया बाबर यांनी सांगितले की, आरती, अभंग आणि टाळ-मृदुंगाच्या गजरामुळे संपूर्ण सेट भक्तिमय वातावरणात रंगून गेला होता. चित्रीकरणादरम्यान कलाकार आणि तांत्रिक टीमनेही अभंग गात आषाढीचा आनंद साजरा केला.

भक्ती, अन्नसेवा, संस्कृती आणि कथानकातील नवे ट्विस्ट यांचा सुंदर मिलाफ असलेले ‘सनई चौघडे’ आणि ‘कमळी’चे आषाढी विशेष भाग प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहेत.

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”

Web Title: Special ashadhi wari themed episodes will be aired in zee marathis sanai choughade and kamali serials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक
1

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक

Suniel Shetty: सुनील शेट्टींच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कल्चरल आयकॉन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित
2

Suniel Shetty: सुनील शेट्टींच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कल्चरल आयकॉन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज
3

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज

Poonam Pandey :’वेश्याव्यवसाय लीगल करा..’, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ, एडल्ट कंटेंटबाबतही केलं मोठं विधान
4

Poonam Pandey :’वेश्याव्यवसाय लीगल करा..’, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ, एडल्ट कंटेंटबाबतही केलं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.