Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झाली बिझनेसवुमन! अभिनयासोबत आता हॉटेल इंडस्ट्रीतही नवी इनिंग

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्री माधवी निमकरने अभिनयासोबत व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. नवीन हॉटेल सुरू करत असल्याची घोषणा तिने सोशल मीडियावर केली. जाणून घ्या तिच्या नव्या व्यवसायाविषयी आणि अभिनय प्रवासाविषयी.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 01:58 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत आहेत. काही कलाकारांनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे, तर काहींनी हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे, अनघा भगरे आणि मृणाल दुसानीस यांच्यानंतर आता लोकप्रिय अभिनेत्री माधवी निमकर हिनेही हॉटेल व्यवसायात नवी इनिंग सुरू केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या माधवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नव्या व्यवसायाची घोषणा केली. तिच्या हॉटेलचं नाव ‘कल्याणमस्तु’ असं असून, हे हॉटेल कल्याण येथे सुरू होणार आहे.

माधवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत, “मोठी घोषणा… काहीतरी मोठं… लवकरच!” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमधून तिने नव्या व्यवसायाची झलक दाखवली असून, हॉटेलविषयीची अधिक माहिती ती लवकरच चाहत्यांसोबत शेअर करणार असल्याचं सांगितलं आहे.

नवी मालिका सुरू होण्याआधी ऐश्वर्या नारकर आणि ‘ही’ अभिनेत्री पोहोचल्या मॉरिशसला; पोस्ट शेअर करत सांगितलं खास कारण

माधवीच्या या नव्या प्रवासाचं चाहत्यांनी आणि मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उत्साहाने स्वागत केलं आहे. तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अभिनयासोबत व्यवसायातही ती यशस्वी ठरो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर आता माधवी निमकर उद्योजिका म्हणूनही नवी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या ‘कल्याणमस्तु’ या नव्या हॉटेलबाबतची अधिकृत माहिती आणि उद्घाटनाची तारीख जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत खलनायिका शालिनीची भूमिका साकारून माधवी निमकर घराघरात पोहोचली. तिच्या दमदार अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आणि तिला मोठी लोकप्रियता मिळाली.

माधवीने याआधी ‘पुढचं पाऊल’, ‘जावई विकत घेणे आहे’, ‘चार दिवस सासूचे’, ‘कुंकू’ आणि ‘स्वप्नांच्या पलीकडले’ यांसारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यासोबतच तिने मोठ्या पडद्यावरही आपली छाप पाडली आहे. ‘पावनखिंड’, ‘संघर्ष’ आणि ‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.

सध्या माधवी ‘तुझ्या सोबतीने’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून, अभिनयासोबतच आता ‘कल्याणमस्तु’ या हॉटेलच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रातही तिने नवी इनिंग सुरू केली आहे.

Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame madhavi nimkar turned businesswoman set to launch kalyanamastu hotel in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • hotel
  • marathi actress

संबंधित बातम्या

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
1

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
3

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
4

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.