Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मालिका सुरू होण्याआधी ऐश्वर्या नारकर आणि ‘ही’ अभिनेत्री पोहोचल्या मॉरिशसला; पोस्ट शेअर करत सांगितलं खास कारण

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि तितीक्षा तावडे दोघींचे मॉरिशसमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्या नेमक्या कोणत्या कारणासाठी तिथे गेल्या आहेत, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर दोघींनीच या दौऱ्यामागचं खास कारण सांगितलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 11:03 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Maharashtra Mandal Mauritius Exhibition: मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या दमदार अभिनयामुळे घराघरात पोहोचलेल्या ऐश्वर्या यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या आगामी मालिकेची चाहत्यांना उत्सुकता असतानाच त्या सध्या एका खास कारणामुळे मॉरिशसमध्ये आहेत. अभिनेत्री तितीक्षा तावडेसोबत त्यांनी मॉरिशसमधील महाराष्ट्र मंडळाच्या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

अभिनयासोबतच ऐश्वर्या नारकर यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. ऐश्वर्या, तितीक्षा तावडे आणि सुरूची अडारकर या तिघींनी मिळून ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ या साड्यांच्या ब्रँडची सुरुवात केली. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या या ब्रँडला अल्पावधीतच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, आकर्षक आणि वेगवेगळ्या कलेक्शनमुळे हा ब्रँड चर्चेत आहे.

सध्या ऐश्वर्या आणि तितीक्षा मॉरिशसमध्ये आयोजित महाराष्ट्र मंडळाच्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. याबाबत दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या दौऱ्यामागचं कारण चाहत्यांना सांगितलं.


व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या, “आम्ही दोघी सध्या मॉरिशसमध्ये आहोत. महाराष्ट्र मंडळाचं प्रदर्शन येथे आयोजित करण्यात आलं असून भारतातील अनेक उद्योजक यात सहभागी झाले आहेत. ज्वेलरी, खाद्यपदार्थ, लहान मुलांचे कपडे, साड्या, शोभेच्या वस्तू अशा विविध उत्पादनांचे स्टॉल येथे आहेत. त्यामध्ये आमच्या ‘थ्रेड अँड ठुमका’ ब्रँडचाही स्टॉल आहे. आमच्या साड्यांच्या ब्रँडचं हे पहिलंच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आहे.”

केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

दोघींनी पुढे सांगितले की, “लकी ड्रॉद्वारे स्टॉलचे क्रमांक ठरवण्यात आले आणि आमच्या स्टॉलला पहिला क्रमांक मिळाला. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.”

यावेळी त्यांनी सुरूची अडारकरबाबतही माहिती दिली. “काही कारणास्तव सुरूची आमच्यासोबत येऊ शकली नाही. त्यामुळे आम्ही दोघीच मॉरिशसमध्ये आलो आहोत. आम्ही फक्त दोन दिवस इथे थांबणार आहोत. त्यानंतर भारतात परतणार आहोत, कारण ‘नाईकबाई’ मालिकेचं शूटिंग सुरू आहे,” असे ऐश्वर्या आणि तितीक्षा यांनी सांगितले.


Dil Deewana Ho Gaya Movie : ‘दिल दिवाना हो गया’चा Trailer रिलीज; रोमँस आणि संगीताचा रंगतदार प्रवास 31 जुलैपासून

अभिनयासोबतच उद्योजक म्हणूनही ऐश्वर्या नारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली ही झेप चाहत्यांकडून कौतुकास्पद ठरत असून, थ्रेड अँड ठुमका By Tasvi’च्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे त्यांच्या ब्रँडला जागतिक व्यासपीठ मिळाल्याची चर्चा आहे

Web Title: Aishwarya narkar and titiksha tawde visit mauritius reveal the reason behind their trip in a video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा
1

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
2

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
3

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
4

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.