Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७ वर्षांनंतर बॉलिवूडच्या ‘हिरो नंबर १’ची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री; गोविंदाच्या नव्या सिनेमाची घोषणा

Govinda Comeback: बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल सात वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनेता गोविंदाने आपल्या नव्या 'रूपा' चित्रपटाची घोषणा केली असून, या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 10:13 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
Govinda Comeback: ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या खास अभिनयशैली आणि कॉमिक टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गोविंदा आता ‘रूपा’ या नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली.

गोविंदाने सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आपल्या आगामी चित्रपटांची माहिती दिली. यावेळी त्याच्यासोबत ‘रूपा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री राणी स्वर्णकर उपस्थित होती. या चित्रपटाची निर्मिती स्वतः गोविंदाच करत असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोविंदा म्हणाला, “मी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणार नाही, असे अनेकदा बोलले गेले. पण आता मी नव्या जोमाने सुरुवात करत आहे. प्रेक्षकांनी, विशेषतः तरुणांनी, याआधी कधीही पाहिला नसेल असा चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना स्वप्न साकार झाल्यासारखे वाटेल.”

केवळ भाषांतर नाही तर…; १४ भाषांमध्ये डब होणारी Heeramandi ठरली पहिली भारतीय सिरीज! ४३ देशांमध्ये ‘टॉप १०’ मध्ये स्थान

गोविंदाने पुढे सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होईल आणि संपूर्ण स्टारकास्टसह पुन्हा पत्रकार परिषद घेतली जाईल. हा चित्रपट तरुण प्रेक्षकांना विशेष आवडेल आणि अनेक गोष्टींमागचे सत्य उलगडून दाखवेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

चित्रपटाच्या कथानकाबाबत गोविंदाने कोणताही खुलासा केला नसला, तरी या सिनेमातून अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळणार असल्याचे त्याने सांगितले. बॉलिवूडमध्ये नव्या प्रतिभावंतांना व्यासपीठ देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, गोविंदाच्या पुनरागमनाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, तब्बल सात वर्षांनंतर तो पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Payal Rohatgi Exclusive Interview: ‘चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर…’, बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला ‘हा’ खास मंत्र

Web Title: After 7 years govinda makes a comeback bollywood hero no 1 returns with roopa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Govinda

संबंधित बातम्या

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी
1

Priyanka Chopra Jonas: प्रियांका चोप्राची ग्लोबल फॅशनविश्वात मोठी झेप; पॅरिसमधील LVMH Prize मध्ये मिळाली खास जबाबदारी

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
2

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
3

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
4

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.