Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejashree Pradhan: स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’ तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा

Tejashree Pradhan Serial Veen Doghantali Hi Tutena : सध्या झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत प्रेक्षकांना स्वानंदीचं नवं रुप पाहायला मिळणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 02:25 PM
tejashree pradhan news

tejashree pradhan news

Follow Us
Follow Us:
  • स्वानंदीचा भाबडेपणा जपून साकारला ‘ड्रंक सीन’
  • तेजश्री प्रधान सांगतिला शुटींगचा ‘तो’ किस्सा
 

Tejashree Pradhan Serial Veen Doghantali Hi Tutena : कलाकार म्हणून काम करताना अनेकदा अशा भावना पडद्यावर उभ्या कराव्या लागतात, ज्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आणि आव्हानात्मक असतात. सध्या झी मराठीवरील ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेत असंच एक वळण पाहायला मिळणार आहे. मालिकेची नायिका ‘स्वानंदी’ म्हणजेच तेजश्री प्रधान हिने नुकताच एक ‘ड्रंक सीन’ शूट केला. नायिकेच्या प्रतिमेला कुठेही धक्का न लावता आणि स्वानंदीचा भाबडेपणा जपून तेजश्रीने हा सीन कसा पूर्ण केला याला किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे.

चौकटीबाहेर जाऊन काम करण्याची संधी मिळाल्यावर तेजश्रीने कसा हा सीन शूट केला या अनुभवाबद्दल सांगताना ती म्हणाली- “एक कलाकार म्हणून हा संपूर्ण सीन माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. जेव्हा तुम्ही नायिकेची भूमिका साकारता, तेव्हा तुमच्यावर मोठी जबाबदारी असते. नायिकेची एक प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात असते आणि अनेकजण तिचे अनुकरण करत असतात; त्यामुळे त्या प्रतिमेचे भान ठेवूनच काम करावे लागते.

शुटींगच्या दरम्यानचा तो किस्सा 

‘स्वानंदी’च्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा हा सीन पूर्णपणे वेगळा होता. दारू प्यायल्यानंतर मिळणाऱ्या त्या तात्पुरत्या स्वातंत्र्याचा वापर करून, स्वानंदीने तिच्या चौकटीबाहेर जाऊन हा परफॉर्मन्स केला आहे. तेजश्री म्हणाली की, जेव्हा मला कळाले की, स्वानंदीसाठी असा सीन लिहिला गेला आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला. सहसा नायिकेच्या वाट्याला काही ठराविक साचेबद्ध गोष्टीच येतात, त्या पलीकडे जाऊन तिला वागता येत नाही. पण या निमित्ताने काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळणार असल्याने माझ्यातला कलाकार सुखावला.

खऱ्या आयुष्यात मी ड्रिंक करत नाही, त्यामुळे मित्रमंडळींसोबत बाहेर गेल्यावर मी त्यांची ‘ड्रायव्हर’ बनते. मुंबई पोलिसांची शिस्त अतिशय कडक आहे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही ती पाळतोच. अशा सीन्ससाठी माझे ड्रिंक करणारे मित्रच माझे ‘इन्स्पिरेशन’ ठरतात. जेव्हा तुम्ही पार्टीत असूनही ड्रिंक करत नसाल, तेव्हा तुम्हाला इतरांचे निरीक्षण करण्याची छान संधी मिळते. ते कसे बोलतात, कसे वागतात, हे सर्व मला बारकाईने पाहता येत. यापूर्वीही एका मराठी चित्रपटात मी असा सीन केला होता, ज्यासाठी मला त्या वर्षीचे सहाय्यक व्यतिरेखा स्त्री हा पुरस्कार देखील मिळाला होता.

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

स्वानंदीच्या भुमिकेविषयी काय म्हणाली तेजश्री ?

तांत्रिक अडचण असल्याशिवाय मी साधारणपणे मॉनिटरवर जाऊन माझे शॉट बघत नाही. मला स्वतःला पडद्यावर पाहणे थोडे कठीण वाटते, कारण जर आपल्याला स्वतःच आवडलो नाही, तर पुढच्या कामात आपण गोंधळून जाऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत दिग्दर्शक ‘ओके’ म्हणतोय, तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जाते. या सीनमध्ये मला स्वानंदीपेक्षा खूप वेगळं वागायचं होतं, त्यामुळे काम करताना खूप मजा आली. ज्या स्वानंदीवर प्रेक्षक प्रेम करतात, तिचा भाबडेपणा कुठेही कमी होऊ नये, याचे भान ठेवूनच लेखकांनी हा सीन लिहिला आहे आणि दिग्दर्शकांनी तो उत्तमरीत्या शूट केला आहे.

माझ्यासाठी ही एक पर्वणीच होती.स्वानंदीच्या पात्राबद्दल मला एक गोष्ट विशेष आवडते, ती म्हणजे चॅनेल आणि क्रिएटर्सनी तिला कुठेही टिपिकल मूळू मूळू रडणाऱ्या नायिकेसारखं दाखवलेलं नाही. तिच्यासोबत जे काही घडतंय, त्याबद्दल ती नेहमी प्रश्न विचारते. जिथे ती एरवी बोलू शकत नाही, तिथे व्यक्त होण्याची मुभा या ‘दारूच्या सीन’मुळे स्वानंदीला मिळाली. मला आशा आहे की प्रेक्षकांना स्वानंदीचं हे रूपही नक्कीच आवडेल. असं स्वानंदी म्हणजे तेजश्री प्रधानने सांगितलं आहे.

Zee Marathi Serial : नव्या मालिकांची नांदी; मायलेकींच्या अनोख्या नात्याची नवी गोष्ट, पाहा प्रोमो

 

Web Title: Tejashree pradhan veen dothantali hi tutena zee marathi serial reveals how the drunk was shot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial news
  • Tejashree Pradhan
  • zee marathi

संबंधित बातम्या

अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘Mi Jinkun Ghein Saara’मध्ये रंगणार नवा संघर्ष
1

अनिकेत-छवीच्या नात्यात वाढतोय गोडवा, पण शांभवीच्या कारस्थानांनी वाढली चिंता; ‘Mi Jinkun Ghein Saara’मध्ये रंगणार नवा संघर्ष

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश
2

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला
3

Ravi Prakash: मराठी शिकण्यासाठी रवि प्रकाशने लावली ‘ही’ मालिका; आता ‘दशमी’मधून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला

पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका
4

पडद्यावरची लेक झाली खऱ्या आयुष्यातही खास; अभिनेत्रीच्या लग्नात अभिनेत्याने निभावली वडिलांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.