फोटो सौजन्य : झी मराठी इन्स्टाग्राम
आई लेकीच्या हळव्या नात्याची गोष्ट सांगणारी ही मालिका लवकरच झी मराठीवर येत आहे. या मालिकचं नाव आहे कृष्णाईच्य़ा लेकी. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मातृदिनाच्या निमित्ताने या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला होता. या मालिकेची स्टार कास्ट कोण आहे याबाबतची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. आई आणि मुलीच्य़ा हळव्या नात्य़ाची ही गोष्ट आहे. या प्रोमोमध्ये आई मुलीच्या नात्यावर एक भावनिक कविता सादर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जन्माला आल्यापासून ते लेक म्हातारी झाली तरी आईसाठी तिची लेक लहानच असते अशा आशयाचा हा प्रोमो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
झी टीव्हीवरीव हिंदी मालिका गंगामाई की बेटिया या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक करण्यात येत आहे. गंगामाई की बेटीया या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शेझान खान, शुभांगी लाटकर आणि इंदिरा कृष्णन यांचा समावेश आहे. या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण करण्याचा टप्पा गाठला असून तिला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही हिंदी मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील चर्चेत आहे. या मालिकेच्य़ा मराठीत करण्यात येणाऱ्या रिमेकला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल हे लवकरच कळेल.






