
फोटो सौजन्य - Social Media
या ट्विस्टची झलक दाखवणाऱ्या प्रोमोला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही तासांत या प्रोमोने 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला असून 350 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेक प्रेक्षकांनी सायलीच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया देत पुढे काय घडणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
याबाबत अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, “‘ठरलं तर मग’ मालिकेला लवकरच चार वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आवडलं तेव्हा कौतुक केलं आणि चुकलो तेव्हा हक्काने कानही पिळले. डोहाळ जेवणाच्या दिवशी सायलीला अटक होण्याच्या प्रोमोला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. प्रेक्षकांनी अशीच साथ कायम ठेवावी.”
Jana Nayagan : Vijay Thalapathy च्या शेवटच्या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन! सिनेमा करतोय राडा
मात्र सायली इतक्यात हार मानणारी नाही. स्वतःवरील खोटे आरोप दूर करून सत्य समोर आणण्यासाठी ती खंबीरपणे लढणार आहे. आपल्या बाळाच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि सत्याच्या विजयासाठी सुरू होणारा तिचा हा संघर्ष प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा ठरणार आहे. ‘ठरलं तर मग’ पाहा, दररोज रात्री 8.30 वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.