
फोटो सौजन्य - Social Media
Zee Marathi वरील ‘इच्छादारी नागीण’ या नव्या मालिकेचा शुभ मुहूर्त पार पडला आहे. या शुभ मुहूर्ताचे क्षण सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. आगामी मालिका ‘इच्छादारी नागीण’ 7th Sense Media द्वारे प्रस्तुत असून मालिकेची निंर्मिती शशांक सोळंकीने केली आहे. तर दिग्दर्शक प्रदीप जाधवच्या दिग्दर्शनाखाली मालिका उभारली जात आहे. मालिकेचे छायांकन पंकज कच्छवा करत आहे. 11 जून 2026 पासून या मालिकांचे चित्रिकीकरण सुरु करण्यात आले आहे.
मालिका कधी सुरु होणार? मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार? या सगळ्या गोष्टींची उत्तरे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!
या मालिकेत कोण कलाकार झळकणार या गोष्टी जरी अद्याप जाहीर नसल्या तरी अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकारांनी या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Promo करण्यात आला होता जाहीर!
काही महिन्यांपूर्वी ‘इच्छादारी नागीण’ या मालिकेचा प्रोमो जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये एका नागकन्येची गोष्ट दाखवण्यात आली होती, तसेच कॅप्शनमध्ये ‘सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल ‘नागकन्या’?’ असे नमूद करण्यात आले होते. अद्याप या मालिकेची तारीख जाहीर नसली तरी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून आहे.