( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )
बिग बॉस १९ चा स्पर्धक असलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरे सध्या वादात सापडला आहे. त्याच्या एका शो दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे प्रणीतला त्याचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करावे लागले. प्रणीतच्या या कृतीवर आता मोठ्या प्रमाणावर टीका होत असून, त्याला सोशल मीडियावर प्रचंड शिवीगाळही सहन करावी लागत आहे. दरम्यान, प्रणीतची जवळची मैत्रीण मालती चहरनेही त्याला फटकारले आहे. बिग बॉस १९ च्या घरात हे दोघे जवळचे मित्र मानले जात होते. मात्र, जेव्हा शो अंतिम टप्प्यात होता, तेव्हा मालती आणि प्रणीतमध्ये भांडण झाले आणि त्यांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. आता, जेव्हा मालतीने प्रणीतला फटकारले, तेव्हा चाहत्यांनी याला ‘बिग बॉस १९ चा बदला’ असे म्हणत त्याच्यावर टीका केली.
मालतीने तिच्या एक्स हँडलवर निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, काही लोकांना अजूनही असे वाटते की स्त्रीच्या संमतीचे मूल्य बिर्याणीच्या प्लेटपेक्षा कमी आहे, हे जाणून दुःख होते. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, प्रणीत मोरेच्या अलीकडील स्टँड-अप शोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर ऑनलाइन मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्या क्लिपमध्ये, २३ वर्षीय हिमांशू जांगरा म्हणाला की त्याने डेटवर चिकन बिर्याणीच्या प्लेटवर ३७० रुपये खर्च केले आणि त्यामुळे त्याला त्याच्या खर्चावर परतावा अपेक्षित होता. त्याच्या या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि लोकांनी प्रणीत आणि हिमांशू दोघांवरही टीका केली. या वादग्रस्त टिप्पणीमुळे संमतीचे महत्त्व आणि महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा सुरू झाली. मालतीने तिच्या पोस्टमध्ये, मुख्य अभिनेत्री जान्हवी कपूरचे अति-लैंगिकीकरण केल्याबद्दल पेड्डीवर झालेल्या टीकेलाही उत्तर दिले.
₹370 biryani and Peddi… make you realize why many women are hesitant about marriage, why we value our independence, and why we choose to split the bill. Some women are even financially supporting men entirely. Yet, we continue to be objectified, and a woman’s consent is… — Malti Chahar🇮🇳 (@ChaharMalti) June 10, 2026
मालतीच्या पोस्टमध्ये लिहिले होते, “३७० रुपयांमध्ये मिळणारी बिर्याणी आणि पेडी पाहून लक्षात येते की अनेक स्त्रिया लग्न करण्यास का घबरतात, आम्ही आमच्या स्वातंत्र्याला का महत्त्व देतो आणि बिल वाटून घेण्यास का प्राधान्य देतो. काही स्त्रिया तर पुरुषांचा संपूर्ण खर्चही उचलतात.” तिने पुढे लिहिले, “तरीही, आमच्याकडे केवळ वस्तू म्हणून पाहिले जाते आणि हे स्पष्ट आहे की स्त्रीच्या निवडीला बिर्याणीच्या एका प्लेटपेक्षा जास्त किंमत नाही. समानता, प्रतिष्ठा आणि सन्मानासाठी पिढ्यानपिढ्या लढा देऊनही, आम्हाला अजूनही त्याच जुन्या मानसिकतेचा सामना करावा लागतो, हे पाहून अत्यंत वाईट वाटतं, अशा भावना मालती चाहरने व्यक्त केल्या आहेत..” बिग बॉस १९ दरम्यान मालती आणि प्रणीत चांगले मित्र बनले होते. मालतीसोबतच अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनीही त्याच्यावर टीका केली आहे.






