Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारिणी–केदारच्या लग्नसोहळ्याला सुरुवात; संगीत सोहळ्यात ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स, डोलीतून नवरीची ग्रँड एंट्री

तारिणी आणि केदार यांचा अखेर लग्नसोहळा रंगणार असून लग्नाचे सर्व सोहळे मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 17, 2026 | 12:44 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील तारिणी मालिकेत सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तारिणी आणि केदार यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण अखेर आला असून त्यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. लग्नाचे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडत आहेत.तरी हा सोहळा साधा-सोप्या आनंदापुरता मर्यादित राहणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. प्रत्येक विधीमध्ये नवे ट्विस्ट, थरार आणि नाट्यमय घडामोडींचा भडिमार होताना दिसत आहे.

दरम्यान, या लग्नात सर्वात मोठा धक्का म्हणजे युवराजने रचलेला गुप्त प्लॅन. तो बापुराव जामखंडे यांची भेट घेतो आणि दोघे मिळून असा कट रचतात की, या आनंदाच्या वातावरणात लग्नाऐवजी सुतक पसरलं पाहिजे. त्यांच्या या कटामुळे संपूर्ण सोहळ्यावर संकटाचं सावट निर्माण झालं आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

लग्नाचा पहिला सोहळा असलेल्या मेहंदीमध्येही अडथळे येताना दिसत आहेत. इशा आणि निशी या दोघी तारिणीच्या मेहंदीमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी होणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.याच वेळी, तारिणीच्या बाजूनेही खेळी सुरू आहे. “टीम तारिणी” वेगवेगळ्या वेशात लग्नात दाखल झाली आहे. कोणी फोटोग्राफर, कोणी इव्हेंट मॅनेजमेंट तर कोणी कॅटरिंग स्टाफ बनून. त्यामुळे या लग्नात प्रत्येक कोपऱ्यात काही ना काही गुपित दडलं आहे.

दरम्यान, सर्वात धक्कादायक घटना कौशिकीच्या रूममध्ये घडते. तिथे कोणीतरी जीवघेणा गॅस सोडलेला असतो. पण नशिबाचा खेळ असा की, त्या खोलीत कौशिकी नसून तारिणी असते. याच क्षणी तारिणीला कळतं की हा सगळा कट कौशिकीला मारण्यासाठी रचलेला आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

मेहंदीतील गोंधळानंतर “टीम तारिणी” सतर्क झाली असून, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहे.दरम्यान, संगीत सोहळा मात्र पूर्ण जल्लोषात रंगणार आहे. घरातील सगळे सदस्य डान्स परफॉर्मन्स देताना दिसणार आहेत. सुमी आज्जी ‘सामी-सामी’ गाण्यावर ठेका धरताना दिसणार, तर काव्या आणि नमाचा डान्सही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे. या सगळ्यात खास आकर्षण ठरणार आहे अभिनेता ललित प्रभाकरचा धमाकेदार परफॉर्मन्स. कौशिकीचा खास पाहुणा म्हणून ते या सोहळ्यात हजेरी लावणार असून, तारिणी-केदारला शुभेच्छाही देणार आहेत. याशिवाय, टॉर्च लाईटमध्ये सादर होणारा तारिणी आणि केदारचा रोमँटिक डान्स हा देखील एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.मात्र, आनंदाच्या या वातावरणातही संकटाची छाया कायम आहे. संगीत आणि हळदी या दोन्ही सोहळ्यांमध्ये कौशिकीवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न होत असल्यामुळे तणाव वाढत आहे. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे लग्नाच्या दिवशी तारिणी गौरीहार पूजा करत असतानातिला कळतं की कौशिकीचं अपहरण झालं आहे.

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

कर्तव्याला सर्वात प्राधान्य देणारे तारिणी आणि केदार यांच्यासाठी हा क्षण अत्यंत निर्णायक ठरतो. लग्नाच्या पोशाखातच ते कौशिकीला वाचवण्यासाठी धाव घेतात. त्यामुळे लग्नसोहळा आणि मिशन या दोन्हींची लढत आता एकाच वेळी सुरू होते.या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये, डोलीतून होणारी तारिणीची धडाकेबाज एंट्री प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.आता प्रश्न एकच तारिणी-केदार लग्न पूर्ण करतील का, की आधी मिशन पूर्ण करणार? आणि कौशिकी सुरक्षित परत येणार का? या थरारक वळणांमुळे हा लग्नसोहळा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, हे नक्की

 

Web Title: The wedding celebrations of tarini and kedar have begun lalit prabhakar delivers a spectacular performance at the musical ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi serial news
  • tv serial

संबंधित बातम्या

प्रशांत दाजी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता अमर जाधव आनंदी मालिकेतून दिसणार नव्या भुमिकेत
1

प्रशांत दाजी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता अमर जाधव आनंदी मालिकेतून दिसणार नव्या भुमिकेत

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी
2

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.