Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मालिकेत येणार मोठं वळण, पार पडणार सावित्रीबाई आणि जोतीरावांचा अद्भुत विवाहसोहळा

Mi Savitribai Jotirao Phule Serial: हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 02, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खुप कमी वेळात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

या अद्भूत विवाहसोहळ्याची मांडणी अत्यंत देखणी आणि काळाच्या पार्श्वभूमीला साजेशी करण्यात आली आहे. सावित्री आणि जोतीराव यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण भावपूर्ण पद्धतीने सादर करताना परंपरा, विधी आणि संस्कृतीचा सन्मान राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. खंडोबाला लगीनचिठ्ठी अर्पण करण्याच्या मंगल परंपरेपासून ते मुहूर्तमेढ रोवण्यापर्यंत प्रत्येक विधी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाणार आहे. चुडा भरण्याचा हळुवार सोहळा, हळदीचा मंगल समारंभ, दागिने आणि साडीमागचं सांस्कृतिक व भावनिक महत्त्व या सगळ्या पारंपरिक रितीरिवाजांचं सुंदर दर्शन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

The 50 ’शोची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी बाहेर पडला ‘हा’ स्पर्धक; कधी आणि कुठे पाहायचा हा रिअॅलिटी शो? जाणून घ्या सविस्तर

परंपरा, संस्कार आणि भावनांनी नटलेला हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा ठरणार आहे. हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाईल यात शंका नाही.

स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही सामाजिक इतिहासावर आधारित नाटक आहे. ही मालिका सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या शिक्षणाच्या कार्याची आणि समाज सुधाराच्या प्रवासाची कथा सांगते.

मालिकेत सावित्रीबाई फुले आणि जोतीराव फुले यांची वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील घटनांवर प्रकाश टाकला जातो. जातिव्यवस्था, अस्पृश्यता, महिलांच्या शिक्षणाचा अधिकार, सामाजिक समानता आणि अन्यायाविरुद्ध लढा हे मालिकेचे मुख्य मुद्दे आहेत.

Pak मध्ये बंदी असूनही, ‘Dhurandhar’ नेटफ्लिक्सच्या टॉप चार्ट लिस्टवर; शेजारच्या देशात भारतीय चित्रपटाचा डंका!

Web Title: Twist in me savitribai jyotirao phule savitribai and jyotirao grand wedding to take place

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Sukriti kakar Engagement : ‘कर गई चुल्ल’ फेम सुकृति कक्कड़चा साखरपुडा, रोमँटिक अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज
1

Sukriti kakar Engagement : ‘कर गई चुल्ल’ फेम सुकृति कक्कड़चा साखरपुडा, रोमँटिक अंदाजात बॉयफ्रेंडने केलं प्रपोज

Women Directors 2026: भारतीय सिनेसृष्टीत महिलाराज! या ५ लेखिका-दिग्दर्शिका गाजवणार आपला ठसा
2

Women Directors 2026: भारतीय सिनेसृष्टीत महिलाराज! या ५ लेखिका-दिग्दर्शिका गाजवणार आपला ठसा

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा
3

Independence Day 2026: ZEE5 वर खास स्वातंत्र्यदिन वॉचलिस्ट; देशभक्तीपर चित्रपट आणि प्रेरणादायी कथांचा खास नजराणा

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश
4

Independence Day Special: स्वप्नांसाठी उभं राहा, पण इतरांचा आदरही करा; ‘कमळी’ आणि ‘ज्योती’चा स्वातंत्र्यदिन विशेष संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.