Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mango Festival : हापूसच्या गोडीत न्हाला झी मराठीचा ‘आंबा महोत्सव २०२६’; कलाकारांसोबत रंगली धमाल, खेळ आणि आमरसाची मेजवानी

झी मराठीच्या ‘आंबा महोत्सव २०२६’च्या दुसऱ्या पर्वात कलाकार, पत्रकार आणि मान्यवरांनी उत्साहात सहभाग घेतला. विविध मालिकांतील कलाकारांनी मजेशीर खेळ, आमरस बनवण्याची स्पर्धा आणि आंब्यांवरील धमाल उपक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हापूस आंब्यांच्या गोड भेटीसह हा उत्सव अविस्मरणीय ठरला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2026 | 11:54 AM
हापूसच्या गोडीत न्हाला झी मराठीचा ‘आंबा महोत्सव २०२६’; कलाकारांसोबत रंगली धमाल, खेळ आणि आमरसाची मेजवानी

हापूसच्या गोडीत न्हाला झी मराठीचा ‘आंबा महोत्सव २०२६’; कलाकारांसोबत रंगली धमाल, खेळ आणि आमरसाची मेजवानी

Follow Us
Follow Us:
  • लाडक्या कलाकारांसोबत रंगला, झी मराठी ‘आंबा महोत्सव’ पर्व २
  • नव्या मालिकेसह, वहिनींसाठी लवकरच खास सरप्राईज
  • मालिकांतील कलाकारांची खास उपस्थिती
Zee Marathi Aamba Mahotsav 2026 : महाराष्ट्राची महावाहिनी म्हणून ओळख असलेल्या झी मराठीने यंदाही ‘आंबा महोत्सव २०२६’च्या दुसऱ्या पर्वाचे भव्य आयोजन करत कलाकार, पत्रकार आणि मान्यवरांसाठी खास आनंदसोहळा रंगवला. फळांचा राजा आंबा आणि मनोरंजनाची राणी झी मराठी यांच्या संगमातून झालेला हा उत्सव उत्साह, धमाल आणि गोड आठवणींनी भरलेला ठरला. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर यंदाचा महोत्सव अधिक मोठ्या आणि आकर्षक स्वरूपात सादर करण्यात आला. अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री तनिष्का विशे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत वातावरणात रंगत आणली.

या महोत्सवात ‘सनई चौघडे’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘शुभ श्रावणी’, ‘दीपज्योती’, ‘वीण दोघातली हे तुटेना’, ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘तुला जपणार आहे’ या मालिकांमधील कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. हास्य, आठवणी आणि आंब्यावर आधारित मजेशीर खेळांनी संपूर्ण दिवस रंगून गेला. सर्वात पहिल्या खेळात जोड्या मंचावर अवतरल्या आणि चढाओढ रंगली ती वर टांगलेल्या टोपलीत कोण जास्त लवकर आंबे पोहोचवणार? या खेळात धमाल उडाली. काही जोडप्यांनी खेळात भाग घेतला, तर काहींनी प्रेक्षक म्हणून या मजेचा मनमुराद आनंद लुटला.

Kamal Haasan: “संकट काळात राजकारण नको, देश प्रथम क्रमांकावर हवा”; कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन!

यानंतर कलाकारांनी “आंबा-कारल शॉट्स” या खेळात दरम्यान सेटवरील अनेक मजेशीर किस्से उलगडले यात आपल्या लाडक्या ज्योतीला कारल्याचा जूस प्यावा लागला. त्यानंतर घरातील मोठ्यांनी पुढाकार घेत आमरस काढण्याची जबाबदारी सांभाळली. आणि आमरस तयार करून त्यांनी आपल्या टीममधील सह कलाकारांना तो चाखायला दिला आणि आपल्या टीमला विजयी बनवले. शेवटी झी मराठीच्या सर्वात छोट्या सदस्यांनी म्हणजेच सावल्याची जणू सावली मालिकेतील अबीर आणि ओवी यांनी “आंबा-पाणी” हा खेळ रंगवला. या खेळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच उत्साहाने सहभाग घेत जल्लोष केला. एकूणच, आंबा महोत्सवात प्रत्येक जण उत्साह, आनंद आणि धमाल मस्तीमध्ये रंगून गेला. खेळांतील विजेत्यांना आणि सर्व कलाकार, पत्रकार मित्रांना हापूस आंब्यांची भेट देण्यात आली, ज्यामुळे उत्सवाची गोडी आणखी वाढली.

याच मंचावरून झी मराठीने त्यांच्या आगामी ‘कृष्णाईच्या लेकी’ ह्या मालिकेचा नवीन प्रोमो पत्रकार आणि प्रेक्षकांसमोर आणला. या मालिकेतून बहुआयामी आणि जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ ‘कृष्णा आई’ची भूमिका साकारणार आहेत. तसेच, या ‘आंबा महोत्सवात’ आणखी काही खास चाहूलही लागली असून महाराष्ट्रातील लाडक्या वहिनींसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे ‘दार उघड बये’ म्हणत झी मराठी लवकरच कोणीतरी येणार आहे. याचसोबत मराठी Z5 ला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदही येथे साजरा करण्यात आला आणि वाहिनीने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. ‘आंबा महोत्सव’च्या दुसऱ्या पर्वासह झी मराठीने परंपरा, संस्कृती, आणि प्रभावी कथाकथनाचा उत्सव अधिक भक्कमपणे साजरा केला आहे.

एकूणच, झी मराठीचा ‘आंबा महोत्सव २०२६’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम न ठरता कलाकार, पत्रकार आणि उपस्थितांसाठी आनंद, गोडवा आणि अविस्मरणीय आठवणींचा सोहळा ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांसह सर्व कलाकार आणि पत्रकार मित्रांना हापूस आंब्यांची खास भेट देण्यात आली, ज्यामुळे उत्सवाची गोडी आणखी वाढली.

Apurva Nemlekar : ‘प्रत्येक मुलीला हक्काचं घर…’ अपुर्वा नेमळेकरची भावनिक पोस्ट ; ट्विशा शर्माप्रकरणात अभिनेत्री स्पष्टच म्हणाली

Web Title: Zee marathi aamba mahotsav 2026 second phase artists fun games hapus mangoes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • mango festival
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!
1

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
2

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार
3

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Jay Jay Swami Samarth: मार्तंडचा डाव यशस्वी होणार की उलटणार? स्वामींविरोधात सुभेदारांचा मोठा निर्णय; ४ दिवसांची मुदत
4

Jay Jay Swami Samarth: मार्तंडचा डाव यशस्वी होणार की उलटणार? स्वामींविरोधात सुभेदारांचा मोठा निर्णय; ४ दिवसांची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.