Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झी मराठीची अनोखी परंपरा, ‘दीपज्योती’ लाँच पत्रकार परिषद ठरली संस्मरणीय; महिला कुटुंब चालकांचा विशेष सहभाग

महिला कुटुंब चालकांच्या उपस्थितीत पार पडली ‘दीपज्योती’ची भावस्पर्शी पत्रकार परिषद. ही पत्रकार परिषद केवळ औपचारिक न राहता एक भावनिक आणि संस्मरणीय अनुभव ठरली.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 11, 2026 | 04:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठी नेहमीप्रमाणे आपल्या नव्या मालिकांच्या लाँचवेळी काहीतरी वेगळा आणि लक्षवेधी उपक्रम सादर करत असते. यावेळी ‘दीपज्योती’ या नव्या मालिकेच्या पत्रकार परिषदेतही असाच एक खास आणि प्रेरणादायी कार्यक्रम पाहायला मिळाला.ही पत्रकार परिषद केवळ औपचारिक न राहता एक भावनिक आणि संस्मरणीय अनुभव ठरली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिला कुटुंब चालकांची उपस्थिती लाभली.

त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण सोहळ्याला एक वेगळीच संवेदनशीलता आणि अर्थ प्राप्त झाला. ‘दीपज्योती’च्या लाँचमुळे झी मराठीच्या या नव्या मालिकेबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

‘दीपज्योती’ ही प्रेमाने आणि आपुलकीने बांधलेल्या बहीण-भावांच्या नात्याची कथा आहे. ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भाऊ यांच्याभोवती ही गोष्ट फिरते. दुसरीकडे, पुरुषोत्तम यांच्या घरंदाज कुटुंबाची कथा उलगडते. त्यांचे तीन मुलं, स्वराज, दीप आणि विराज आणि त्यांच्यासोबत आत्या असते. स्वराज वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यास उत्सुक आहे, तर विराज आपल्या नोकरीत समाधानी आहे. मात्र, दीपच्या मनात वडिलांविषयी राग आहे. लहानपणी आईच्या निधनासाठी त्यालाच जबाबदार ठरविल्याने पुरुषोत्तम त्याचा तिरस्कार करतात.

”मासिक पाळी असतानाही मी..”, अभिनेत्रीच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

या मालिकेच्या पत्रकार परिषदेत महिला कुटुंब चालकांनी (रिक्षा चालक) ज्योतीसोबत रिक्षा चालवत तिच्या संघर्षाला सलाम केला. काहींनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींनी आपल्या आवडीपोटी हे क्षेत्र निवडल्याच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या. या कथा ऐकून उपस्थित सर्वजण भावूक झाले. या धाडसी महिलांना खास कस्टमाइज्ड ‘पदरावर रिक्शा असलेली पैठणी’ भेट देण्यात आली. तसेच उपस्थित रिक्षा चालक महिलांसाठी सर्वांसाठी मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात आला.

Gaurav More : “फिल्टरपाडा ते पवई…” आठवण की मुळांची जाणीव? घराच्या ‘त्या’ पाटीवरून अखेर व्यक्त झाला गौरव मोरे!

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कलाकार प्रसाद जवादे, पूर्वा कौशिक, अनुप बेलवलकर आणि मानसी सुभाष हे महिला प्रेक्षकांच्या तसेच मीडिया प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावून गेले. त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
‘दीपज्योती’ या मालिकेत दीप आणि ज्योती यांच्या मुख्य भूमिकेत प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.तसेच या मालिकेत डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचे लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केले असून संवादलेखन इरफान मुजावर यांनी केले आहे. मालिकेचे दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केले आहे.

Web Title: Zee marathis unique tradition deepjyoti launch press conference turns into a memorable event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
4

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.