फोटो सौजन्य - Social Media
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत, गौरवने त्याच्या नवीन घराच्या पाटीवर लिहलेल्या नावामागचे कारण सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की, “आता स्वतःचं घर झालंय या गोष्टीमुळे जर मी हवेत उडू लागलो, तर दारावरचं ते नाव मला पुन्हा जमिनीवर आणेल. मी ज्या वस्तीतून आलोय, त्या मुळांची जाणीव मला सदैव राहावी त्यामुळे मी दारावर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असं लिहून घेतलं आहे.” हे सांगताना गौरवच्या डोळ्यात त्याच्या मुळांविषयी असलेले प्रेम आणि सार्थ अभिमान झळकून येत होते. पुढे गौरव म्हणतो की, “फिल्टरपाडा आणि पवई, दोघांमधील अंतर फक्त 1 ते दीड किलोमीटर आहे. तरी मला ते पार करण्यासाठी तीस वर्षांचा काळ लागला.”
सोशल मीडियावर गौरव मोरेच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत, त्याची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले आहे. अनेक चाहत्यांनी ‘आपलासा वाटणारा आपल्यातला कलाकार’ अशी उपमा गौरव मोरेला दिली आहे.
गौरवने केले लग्न, कोण आहे पत्नी?
गौरवने लग्न केले आहे. प्रसिद्ध प्रियांका कारेकरसह तिने लग्नगाठ बांधली आहे. प्रियांका मनोरंजसृष्टी संबंधित आहे. तिने बॉलिवूडमधील अनेक दिगदर्शकांसह काम केले आहे. गौरवची खास मैत्रीण आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौरवच्या गुपचूप लग्नाबाबत खुलासा केला आहे तसेच अभिनंदन केले आहे.






