(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
या चित्रपटात तिचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत असून, काही इंटिमेट सीन्समुळेही ती चर्चेत आली आहे. या चित्रपटा तिने बीना त्रिपाठी हे आव्हानात्नक पात्र साकारलं आहे. नुकत्याच ANIला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने आपल्या भूमिकेसोबत इंटिमेट सीन्यच्या शूटिंगबद्लही मनमोकळ्या गप्पा मारल्या.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने स्पष्ट केलं की, पडद्यावर दिसणाऱ्या बीना त्रिपाठीपेक्षा तिचं खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळं आहे. आपल्या भूमिकेच्या तुलनेत खऱ्या आयुष्यात आपण केवळ एक टक्काही तशी नसल्याचं तिने सांगितलं.
इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत रसिकाने सांगितलं की, सध्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, जसं ॲक्शन सीक्वेन्ससाठी फाईट मास्टर असतो, त्याचप्रमाणे इंटिमेट सीन्ससाठी इंटिमसी कोऑर्डिनेटर काम करतो. शूटिंगपूर्वी या सीन्सची तयारी आणि वर्कशॉप केली जाते. कोणत्या गोष्टी कलाकारांसाठी सोयीस्कर आहेत आणि कोणत्या नाहीत, याबाबत आधीच चर्चा केली जाते.
कलाकार आणि सहकलाकार दोघांच्याही सोयीचा विचार करून सीन कसा साकारायचा, यावर टीम काम करते. त्यानंतर दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला परिणाम सुरक्षित आणि व्यावसायिक पद्धतीने कसा साधता येईल, यावर चर्चा केली जाते.
एखाद्या कलाकाराला एखादा शॉट किंवा कृती अस्वस्थ करणारी वाटत असेल, तर त्याच परिणामासाठी दुसरा पर्याय शोधला जातो, असंही रसिकाने सांगितलं. त्यामुळे कलाकारांच्या सीमांचा आदर राखत संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते.
रसिकाच्या मते, इंटिमसी कोऑर्डिनेटरमुळे सेटवर कलाकारांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी वातावरण मिळतं. ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचं तिने अधोरेखित केलं.
Bigg Boss 20 Contestants: ‘बिग बॉस २०’च्या स्पर्धकांची यादी समोर; १८ चेहरे गाजवणार सलमान खानचा शो!
‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनमध्ये नव्हते इंटिमसी कोऑर्डिनेटर
रसिकाने सांगितलं की, ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सीझनच्या काळात इंटिमसी कोऑर्डिनेटरची संकल्पना आजच्या तुलनेत नव्हती. परदेशात ही पद्धत आधीपासून अस्तित्वात होती, मात्र भारतात तो नंतर आला.
तरीही ‘मिर्झापूर’च्या टीमने सुरुवातीपासूनच कलाकारांच्या सोयीचा आणि सुरक्षिततेचा विचार केला असल्याचं रसिकाने सांगितलं. तिच्या मते, त्या वेळी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम संवेदनशील होती.
शूटिंगपूर्वीच दिग्दर्शकासोबत चर्चा
रसिकाने पुढे सांगितलं की, कोणते शॉट्स शूट केले जाणार आहेत आणि ते कशा पद्धतीने चित्रित केले जातील, याची तिला आधीच माहिती दिली जात होती. दिग्दर्शकाने तिच्याशी याबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली होती. त्यामुळे एखादी गोष्ट अस्वस्थ करणारी वाटल्यास आपली भूमिका मांडण्याची आणि नकार देण्याची मुभा तिला होती.
इंटिमसी कोऑर्डिनेटर्सच्या महत्त्वावर कितीही भर दिला तरी तो कमीच असल्याचं रसिकाने म्हटलं आहे. तिच्या मते, कलाकारांना सुरक्षित आणि व्यावसायिक वातावरण देण्यासाठी अशी व्यवस्था अत्यंत गरजेची आहे.
Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर






