हरमनप्रीत कौर (फोटो- ट्विटर)
झिम्बाब्वे विरुद्धच्या या तिसऱ्या T20 सामन्यात हरमनप्रीत कौर हिने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाली. तिने विरोधी गोलंदाजीचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. ४१ बॉलमध्ये नॉटआउट ९१ रन्सची ही खेळी करताना तिने अनेक सिक्स आणि फोर मारले. यामधून तिचा फॉर्म आणि क्लास दिसून आला.
खेळाच्या मैदानावर नेहमीच कणखर आणि आक्रमक म्हणून ओळखली जाणारी हरमनप्रीत कौर, सामन्या संपल्यानंतरच्या एका मुलाखतीत मात्र अत्यंत भावुक झालेली पाहायला मिळाली. मुलाखत सुरू असताना अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाल्यामुळे टी पुढे काही न बोलताच मुलाखत सोडून गेल्याचे दिसून येत आहे.
The body language is saying something… Why does Harmanpreet Kaur look so emotional? With the Smriti Mandhana vs Harmanpreet Kaur captaincy debate brewing, is there more happening behind the scenes than we know? 🏏🔥 https://t.co/FPxhVfhu8Q — Abhi (@abhim3010) October 20, 2026
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सामना संपल्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूवी रमन यांच्याशी संवाद साधताना हरमनप्रीत अचानक भावूक झाल्याचे दिसून आले. तिने सांगितले की, रमन यांनी तिला असा सल्ला दिला होता की, आता तिने कोणाचाही विचार न करता नेमके तेच करावे, जे तिला स्वतःला करायचे आहे. माजी प्रशिक्षकांच्या या शब्दांचे स्मरण करताना हरमनप्रीत कौर हिचा आवाज अचानक भरून आला. या अत्यंत भावनिक वातावरणात तिने मुलाखतीच्या शेवटी माइक पुढे केला आणि ती तिथून निघून गेली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका






