Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Mr Faisu Wedding Photos: सोशल मीडिया स्टार आणि यूट्यूबर Mr. Faisu म्हणजेच फैजल शेख याने इन्स्टाग्रामवर निकाहचे 18 फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पवित्र मदिना शहरात संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत त्याचा निकाह पार पडल्याचे त्याने कॅप्शनमध्ये सांगितले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 03:20 PM
Faisal Shaikh Wedding Photos: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Faisal Shaikh Wedding Photos: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियाचा किंग, यूट्यूबर Mr. Faisu म्हणजेच फैजल शेख सध्या त्याच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या, पण आता स्वतःने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पवित्र मदिना शहरात त्याचा लग्न सोहळा पार पडला. हे फोटो काही मिनिटांत तुफान व्हायरल झाले असून कमेंटचा पाऊस पडतोय.

लग्नपत्रिकेवरून झाला खुलासा

युविका चौधरीच्या एका व्लॉगमध्ये एक सजलेली लग्नपत्रिका दिसली. त्यामुळे या चर्चांना उधाण आले. त्या पत्रिकेवर “Mr. Faisu आणि तान्या” असे स्पष्ट लिहिले होते. त्यामुळेच लोक अंदाज लावत होते की फैजलच्या बायकोचे खरे नाव निखत फातिमा असू शकते. तान्य हे तिचे लाडाचे नाव असावे. पत्रिका व्हायरल झाल्यापासूनच लोक सारखे विचारत होते की नक्की लग्न कधी आहे, मुलगी कोण आहे. पण फैजलने त्यावेळी काहीच सांगितले नव्हते. Mr Faisu Wedding Photos:

लग्नाच्या फोटोवर फैसूचे कॅप्शन

“आणि आम्ही तुमची जोड्यांच्या रूपात निर्मिती केली” 🤍 | कुराण ७८:८ एका स्वप्नाचे वास्तवात रूपांतर झाल्याबद्दल अल्लाहचे आभार (अल्हम्दुलिल्लाह) 🤲🏻❤️ मदिनासारख्या सुंदर शहरात, माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत माझा ‘निकाह’ संपन्न झाला. हा एक असा आशीर्वाद आहे जो शब्दांत मांडता येणार नाही.

Madhuri Dixit: दोघींची मुलं एकाच शाळेत, पण माधुरी दीक्षितने आजवर ‘या’ अभिनेत्रीसोबत केलं नाही काम! आता दिसणार एका स्क्रीनवर

आम्ही एकत्रपणे या सुंदर प्रवासाची सुरुवात करत असताना, कृपया आम्हाला तुमच्या दुआंमध्ये (प्रार्थनांमध्ये) लक्षात ठेवा. अल्लाह आमच्या या विवाहाला असीम प्रेम आणि बरकतीने (समृद्धी व आशीर्वादाने) भरभरून आशीर्वाद देवो. आमीन 🤍🕌” असे कॅप्शन फैसूने दिले आहे.

फैजलने लग्नाचे किती फोटो शेअर केले?

फैजलने तब्बल 18 फोटो शेअर केले आहेत. फैजलने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली. तसेच त्यांच्या बायकोने ऑफ व्हाईट रंगाचा शरारा त्यावर लाल रंगाची ओढणी घेतली आहे.

पांढऱ्या बुरख्यातील व्हिडिओ व्हायरल

लग्नपत्रिकेनंतर अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यामध्ये पांढरा बुरखा परिधान केलेल्या मुलीच्या बाजूला फैजल उभा होता. आजपर्यंत कधीच कोणत्या मुलीसोबत तो अशा पद्धतीने पब्लिकमध्ये दिसला नव्हता. दरम्यान लोकांना खात्री पटली की
हीच मुलगी त्याची होणारी बायको असावी.

मदिनामध्ये लग्न

फैजलने स्वतः एका यूट्यूब व्लॉगमध्ये या सगळ्या बातम्यांना दुजोरा दिला. तो म्हणाला की तो खूप नशीबवान आहे कारण त्याचे लग्न अल्लाहचे घर असलेल्या पवित्र मदिना शहरात होणार आहे. यापेक्षा मोठी गोष्ट त्याच्यासाठी कोणतीच नाही. मात्र त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल जास्त काही माहिती दिली नाही. ती काय करते, तिचे शिक्षण काय आहे याबद्दल तो काहीच बोलला नाही. त्याला कदाचित सगळे प्रायव्हेटच ठेवायचे असेल.

Char Yaar Web Series: सई ताम्हणकर ते चंकी पांडे; ‘चार यार’मध्ये झळकणार दिग्गज कलाकार, रिलीज डेट जाहीर

जन्नत जुबेरचा चॅप्टर बंद

फैसूचे नाव आधी अभिनेत्री जन्नत जुबेरसोबत खूप जोडले गेले होते. दोघेही टिकटॉकच्या काळापासून एकत्र व्हिडिओ बनवायचे. लोकांना वाटायचे की दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. पण दोघांनीही कधीच या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिला नाही. ब्रेकअपच्या चर्चांवर पण दोघे गप्पच राहिले. पण आता फैसूच्या लग्नाच्या बातमीने हे स्पष्ट झाले आहे की तो आता आयुष्यात पुढे गेला आहे आणि त्याने जुन्या सगळ्या गोष्टी मागे सोडल्या आहेत.सध्या फैसूच्या लग्नाचे फोटो पाहून त्याचे फॅन्स खूप खुश आहेत. सगळेजण त्याला अभिनंदन करत आहेत. टिकटॉकपासून ते यूट्यूबपर्यंत त्याने खूप मोठा प्रवास केला आहे आणि आज तो इंडियातला सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्सर आहे.

Web Title: Mr faisu faisal shaikh wedding photos nikah madina rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
1

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
2

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा
3

SINDHUDURG News: सावंतवाडीत १७ लाखांच्या कथित गैरव्यवहारावरून गदारोळ; पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा

Madhuri Dixit: दोघींची मुलं एकाच शाळेत, पण माधुरी दीक्षितने आजवर ‘या’ अभिनेत्रीसोबत केलं नाही काम! आता दिसणार एका स्क्रीनवर
4

Madhuri Dixit: दोघींची मुलं एकाच शाळेत, पण माधुरी दीक्षितने आजवर ‘या’ अभिनेत्रीसोबत केलं नाही काम! आता दिसणार एका स्क्रीनवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.