Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar : नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ

नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी पाटेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2026 | 06:01 PM
नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ

नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ

Follow Us
Follow Us:

नागपूर : नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी पाटेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जलसंधारणाच्या यशस्वी 25 वर्षांच्या निमित्तानं या परिषदचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान, मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी नाना पाटेकर यांनी केलेले विधान संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले आहे. “मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो,” असे म्हणत नाना पाटेकर यांनी उपस्थितांना चक्रावून सोडले. मात्र, त्यांच्या या विधानापाठीमागे कोणतीही नाराजी नसून, दुर्गम भागातील लोकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ असल्याचे स्पष्ट झाले. “डोंगर खेड्यात काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावे, असा विचार मनात येतोय,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढे नाना पाटेकर म्हणाले, “मी शहरात जास्त काळ राहूच शकत नाही. तिथे मला शहरातील भिंती कबरीसारख्या वाटू लागतात. माझे मन गाई, कुत्रे आणि शेतात रमते. आज कोरडवाहू शेतकऱ्याला किती अतोनात त्रास सहन करावा लागतोय, याचा आपण विचार केला पाहिजे. आपण जन्मापासून मोफत श्वास घेतोय, निसर्गाने कधी एक रुपयाही मागितला नाही, याचे भान ठेवले पाहिजे. म्हणूनच आता मी केवळ गावागावात भटकत राहण्याचे ठरवले आहे” असे नाना पाटेकर म्हणाले.

आपण सर्व नागरिक म्हणून एकच

“आपण कोणी राजकीय पक्ष नाही. सरकारला जे करायचे आहे ते ते ठरवतील,” असे स्पष्ट करत त्यांनी स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अजूनही केवळ अंशतः सुरू असल्याकडे लक्ष वेधले. भाजप असो वा काँग्रेस, दोन्ही पक्ष आणि त्यांच्या विचारसरणी वेगवेगळ्या असल्या, तरी सामाजिक प्रश्नांवर आपण सर्व नागरिक म्हणून एकच आहोत. चळवळी या केवळ भाषणापुरत्या मर्यादित न राहता, प्रत्यक्षात कृतीत उतरल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“लहान गावांमध्ये राहणारी मुले आज मोठी शहरे सांभाळत आहेत, ग्रामीण भागात खूप काम करण्याची गरज आहे,” असे सांगत नानांनी भाषणाचा शेवट सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तात्पुरते सुख-दुःख क्षणिक असते, पण एकत्र येऊन काम केले तर मोठे बदल घडवता येतात, हा संदेशही पाटेकर यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ

Web Title: Nana patekars statement in nagpur has created a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nana Patekar
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
1

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
2

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?
4

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.