Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

Mumbai Goa Highway: महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला  जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात येणारे सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी अद्याप जोडले गेलेले नाहीत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 01:28 PM
mumbai goa highway work

mumbai goa highway work

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गाची कहाणी अपूर्णच
  • कोट्यवधींचा खर्च तरी सर्व्हिस रोड-अंडरपास-पादचारी पूल रखडले
  • आदित्य ठाकरेंकडूनही रखडलेल्या कामांवर टीका
देवेंद्र जाधव/Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला तब्बल १८ वर्षे उलटली, कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र महामागांवरील अनेक मूलभूत सुविधांची कामे आजही अपूर्णच आहेत. सर्व्हिस रोड अर्धवट, पादचारी पूल रखडलेले आणि काही अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचलेले, अशी महामार्गाची (ganesh chaturthi 2026 ) अवस्था आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासाचे आश्वासन देणाऱ्या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला  जात असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामांचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात येणारे सर्व्हिस रोड अनेक ठिकाणी अद्याप जोडले गेलेले नाहीत, परिणामी स्थानिक नागरिकांना नाईलाजाने मुख्य महामार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे.

एका बाजूला भरधाव वाहने आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांची वाहतूक, अशा जीवघेण्या परिस्थितीत अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारे पादचारी पूल अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेषतः मोठी गैरसोय होत आहे.

मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी

पावसाळ्यात अंडरपासची अवस्थाही गंभीर झाली आहे. भरणे परिसरातील पादचारी भुयारी मार्गात पाणी साचल्याचे चित्र असून, अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे नागरिकांना त्यातून मार्ग काढणे कठीण होत आहे. ज्या अंडरपासचा उद्देश नागरिकांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडण्याची सुविधा देणे हा आहे, त्याच ठिकाणी पाणी साचत असेल तर या सुविधेचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण प्रवास जलद, सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र १८ वर्षांनंतरही सर्व्हिस रोड, अंडरपास आणि पादचारी पूल पूर्ण होत नसतील, तर चौपदरीकरण नेमके कोणासाठी आणि कशासाठी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला. मात्र त्यानंतरही प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर जबाबदारी नेमकी कोणाची? काने रखडण्यामागे कारण कोणती आणि त्यासाठी जबाबदार अधिका-यावर कारवाई कची होणार, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे. दरम्यान, नुकत्याच कोकण दौऱ्यावर आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेच ठाकरे) पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनीही मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांवरून सरकारवर टीका केली. महामार्गाच्या कामाला तब्बल १८ वर्षांचा कालावधी उत्लटूनही प्रवाशांच्या अडचणी कायम असल्याने संबंधित यंत्रणाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
स्व भा

Web Title: Totally incomplete work on mumbai goa national highway before ganesh chaturthi 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Kokan News
  • Mumbai-Goa highway
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
1

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?
2

दिग्गजांना डच्चू, तरुणांना संधी? मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा; वैष्णव यांना प्रमोशन, गडकरींचे खाते बदलणार?

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा
3

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
4

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.